Vijay Wadettiwar | Allu Arjun | Devendra Fadnavis  sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar Video : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणणारा 'पुष्पा' कोण? विजय वडेट्टीवारांनी नावच सांगितले

Vijay Wadettiwar Statement on Maharashtra Government : भाजपकडे 137 संख्याबळ आहे. त्यामुळे शिंदे काय आणि पवार काय दोघांनाही दिल्लीच्या हायकमांडवरच विसंबून राहावे लागेल. त्यांच्या आदेशाशिवाय यांचा पत्ता देखील हालणार नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

Roshan More

Mumbai News: अभिनेता अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा 2' सिनेमाची मोठी धूम आहे. सिनेमात ज्या प्रकारे पुष्पा मुख्यमंत्री बदलतो तसं महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार आणण्यामागे देशात एक पुष्पा आहे, अशी टीका काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. तुम्ही पुष्पा पाहिला असेल तर महाराष्ट्राचा पुष्पा कोण? हे मला सांगायची गरज नाही.

अदानी हे या सरकारचे पुष्पा आहेत. देशात आणि राज्यात सरकार बनवणारा आणि त्यांना खाली खेचणारा कोणी आहे तर तो अदानी आहे. त्यांच्या मर्जीशिवाय सरकार चालू शकत नाही की बनू शकत नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

भाजपकडून राज्यात ऑपरेशन लोटस करण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, क्रमांक एकवर आणण्यासाठी जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. हे ऑपरेशन लोटस म्हणत आहे. ऑपरेशन लोटस म्हणून लोकशाही यांना शिल्लक ठेवायची नसेल. नाहीतरी देशात अघोषित हुकुमशाहीच आहे.पण जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेईल.

राज्यात मंत्रि‍पदाची यादी अजित पवार आणि एकनाथ शिंदेना भाजपच्या हायकमांडकडे द्यावी लागते. भाजपकडे 137 संख्याबळ आहे. त्यामुळे शिंदे काय आणि पवार काय दोघांनाही दिल्लीच्या हायकमांडवरच विसंबून राहावे लागेल. त्यांच्या आदेशाशिवाय यांचा पत्ता देखील हालणार नाही. यांना वारंवार दयेचा अर्ज करून जेवढं मिळवता येईल तेवढं मिळवा असं आहे. मात्र, दे तो भला ना दे तो भी भला, अशी यांची अवस्था झाली आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

गटनेता दिल्लीत ठरणार

काँग्रेसचा गटनेता दिल्लीत ठरणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. आम्ही एकत्र बसून विरोधी पक्षनेत्याचे नाव ठरवू पण भाजपने, देवेंद्र फडणवीस तयार आहेत की नाही हे कळले पाहिजे. कारण आमच्याकडे तेवढी संख्या नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT