Nana Patole : ज्यांना विरोधी पक्षच नको, ते नेता देणार का? नाना पटोलेंचा सवाल

Nana Patole on BJP Government : पक्षाची भूमिका घेऊनच लढा देणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसचा गटनेता मात्र तुम्हाला अधिवेशनात बघायला मिळेल हे स्पष्ट केले.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महाराष्ट्रातच काय संपूर्ण देशात विरोधीपक्ष नसावा अशी भाजपची इच्छा आहे. हे बघता राज्याच्या विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपदाला मंजूरी देण्यात येईल असे वाटत नाही. सभागृहात विरोधी पक्षनेता असो किंवा नाही त्याने काही फरक पडत नाही.

आम्ही विरोधी पक्षाची भूमिका घेऊनच लढा देणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसचा गटनेता मात्र तुम्हाला अधिवेशनात बघायला मिळेल हे स्पष्ट केले.

Nana Patole
Dhavalsingh Mohite Patil : खासदार ताईंच्या 'अ‍ॅटिट्यूड'मुळे विधानसभेला 'हाता'त भोपळा; जिल्हाध्यक्षांनीही 'बाण' सोडले

महाविकास आघाडीत असलेल्या तीनही पक्षाकडे विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी लागणारे आमदारांचे संख्याबळ नाही. एकूण आमदारांच्या दहा टक्के आमदारांची संख्या विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी आवश्यक असते. असे असले तरी विधानसभेच्या अध्यक्षांनी मजुरी दिल्यास दहा टक्के संख्या नसली तरी विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाऊ शकते. मात्र नाना पटोले (Nana Patole ) यांना भाजप विरोधी पक्षनेता करण्यास मंजूरी देईल असे वाटत नसल्याचे सांगितले. ज्यांना विरोधी पक्षच नको आहे ते विरोधीपक्ष नेतेपदाला मंजूरी देतील काय अशी शंका पटोले यांनी व्यक्त केली.

पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. अशी काहीशी परिस्थिती आता भारतात निर्माण झाली आहे. महाराष्ट्रामध्ये भाजप महायुती निवडून यावी ही जनभावना नव्हती. काही तरी गडबड नक्कीच आहे. त्यामुळे ईव्हीएमवर सर्वांचा रोष आहे. अनेक गावांमध्ये ईव्हीएमच्या (EVM) विरोधात ग्रामसभेचे ठराव घेतले जात आहे. निवडणूक आयोगाने गडबड केली असा आमचा आरोप आहे. आम्ही काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती. मात्र निवडणूक आयोगाने वेबसाईटवर आमचे प्रश्न काढून टाकले आहेत.

Nana Patole
RBI Governor Sign on Indian Currency : 'या' नोटेवर RBI गव्हर्नरची सही नाही! काय आहे कारण?

लोकशाही संपवण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. व्हीव्हीपॅट निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावी अशी व्यवस्था करावी. ती बघितल्यानंतर आम्ही पुन्हा मतदान पेटीत टाकू. अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने नागरिकांच्या शंका दूर करणे गरजेचे असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Nana Patole
Kareena Kapoor Meet PM : तैमूर अन् जहांगीरसाठी करिनाने घेतली पंतप्रधान मोदींकडून 'ही' खास भेट

भाजप महायुतीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आल्याने त्यांना माज आल्याचे दिसते. विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिनंदन प्रस्तावर राजकीय भाषणेच अधिक झाली. मी निवडून आलो नाही अशी टिंगल टवाळी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजप कळली नाही. त्यांना आता त्याचा हळुहळु अनुभव येणार आहे. आता त्यांचेही नेते अमित शहा हेच झाले आहे. सर्वांचेच निर्णय दिल्लीत होणार असल्याचा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com