Local Body Election: MVA फुटणार! स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक शरद पवारांच्या पक्ष स्वबळावर लढणार?

Maharashtra Local Body Election News Sharad Pawar NCP Party : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वेळ पडल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे सांगितले. यामुळे आघाडी फुटणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
Local Body Election
Local Body ElectionSarkarnama
Published on
Updated on

Pune News : तब्बल तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग आणि नंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून या निवडणुका रखडल्या आहेत. मात्र पुढील काही महिन्यांमध्ये आता या निवडणुका होतील असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुती एकत्रित सामोर जाणार की स्वबळाचा नारा दिला जाणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वेळ पडल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची देखील तयारी असल्याचे सांगितले. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महाविकास आघाडी फुटणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Local Body Election
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिपदाचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी! मोदी-शहांच्या भेटीनंतर मोठा निर्णय होणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, "येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपेक्षित आहेत. कारण सत्ताधाऱ्यांना लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांचा वापर करून घ्यायचा होता तो आता संपलेला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होतील, अशी अपेक्षा असल्याचं जगताप यांनी सांगितलं.

राज्यातील 24 महापालिका, 27 जिल्हा परिषद, 300 साडेतीनशे नगरपरिषद आणि पंचायत समितीवर गेले तब्बल तीन वर्ष प्रशासक नेमण्यात आला आहे. यामुळे या राज्याचा खेळखंडोबा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पूर्ण तयारी केली आहे.

Local Body Election
Vinod Kambli: क्रिकेटर विनोद कांबळी यांना आमदार व्हायचं होतं! 'या'मतदारसंघातून लढवली होती निवडणूक

पुण्याचा विचार केल्यास पुण्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची आमची मानसिकता आहे. कारण भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी हे शहर लुटण्याचं काम केलं आहे. त्यातून पुणेकरांची सुटका करण्यासाठी चार पावलं मागे येऊन सर्वांचा मान सन्मान ठेवून महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे.

दुसरीकडे वेळ पडल्यास स्वबळाची तयारी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ठेवली आहे. कारण कार्यकर्ते गेल्या आठ वर्षापासून निवडणुकीची तयारी करीत आहेत. मागील निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर हे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पुण्यातील सर्व जागासाठी आम्ही तयारी केली आहे. परंतु भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढू आणि महापालिकेत महाविकास आघाडी म्हणून पुनरागमन करू, असे जगताप म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com