Walmik Karad Santosh Deshmukh Murder sarkarama
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Murder Case : मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या हत्येत वाल्मिक कराडच मुख्य आरोपी, सीआयडीने फास आवळला!

Walmik Karad Named Prime Accused CID Chargesheet :संतोष देशमुख यांच्या हत्येत थेट वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. त्याला खंडणीच्या गुन्हाअंतर्गत अटक करण्यात आली होती.मात्र सीआयडीच्या दोषारोपपत्रामुळे त्याची अडचण वाढणार आहे.

Roshan More

Walmik Karad News : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात सीआयडीने तब्बल 1500 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येत थेट वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. त्याला खंडणीच्या गुन्हाअंतर्गत अटक करण्यात आली होती. मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्येचा सुत्रधार वाल्मिक कराडच असल्याचे दोषारोपपत्रात सांगितले आहे. तसेच खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे.

वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे दोषारोपपत्रातून सीआयडीने सांगितले आहे. तसेच आरोपींनी कशा प्रकारे कट रचून देशमुख यांची हत्या केली हे स्पष्ट करण्यात आले आहे. दोषारोपपत्रात आरोपी क्रमांक एक म्हणून वाल्मिक कराड याचा उल्लेख आहे. तर, विष्णू चाटे याचा आरोपी क्रमांक दोन म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओ देखील सीआयडीकडे आहेत. रणजीत मुळे सिद्धार्थ सोनावणे यांचा देखील या हत्येत सहभाग आहे का याचा तपास सीआयडीने केला होता. मात्र पुरावे न मिळाल्याने या दोघांचे आरोपपत्रात नाव नसल्याची माहिती आहे. खंडणीत अडथळा आणल्याने आरोपींनी देशमुख यांची हत्या केलाचे उल्लेख देखील दोषारोपपत्रात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT