Maharashtra Politics : मुख्यमंत्री फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का! तानाजी सावंतांच्या 'त्या' निर्णयाला स्थगिती

Devendra Fadnavis vs Eknath Shinde Tanaji Sawant :तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री असताना हजारो कोटींचा अँब्युलन्स खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप होता. त्यातच त्यांच्यावर अनुभव नसलेल्या कंपनीला काम दिल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
Devendra FadnavisEknath Shinde Tanaji Sawant
Devendra FadnavisEknath Shinde Tanaji Sawantsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिल्याचे समोर आले होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे काही झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आत्ता शिंदे मुख्यमंत्री असताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाला फडणवीसांनी स्थगिती दिल आहे.

एकनाथ शिंदे सरकारच्या काळात आरोग्य विभागाच्या 3 हजार 200 कोटी रुपयांच्या कामांना फडणवीस यांनी स्थगिती दिली असल्याची माहिती पुढे आली आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कामाचा कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला यांत्रिक साफसफाईचे कंत्राट दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

Devendra FadnavisEknath Shinde Tanaji Sawant
Vishalgad Fort : विशाळगडावरील अतिक्रमणं जमीनदोस्त होणार? वन मंत्री नाईक म्हणाले, 'गडाचे पावित्र्य'

तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री असताना हजारो कोटींचा अँब्युलन्स खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप होता. त्यातच सर्व सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे येथे बाह्य यंत्रणेद्वारे सफाई करण्याचा करार करण्यात आला होता. त्यासाठी वार्षिक 638 कोटी रुपये तर 3 वर्षांसाठी एकूण 3 हजार 190 कोटी रुपयांचे कंत्राट खासगी कंपनीला देण्याला आला होता. मात्र, कोणताही अनुभव नसताना कंत्राट दिल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी या कामाला ब्रेक लावला आहे.

संजय राऊतांकडून कौतुक

एकनाथ शिंदे यांच्या काळात भ्रष्टाचार झाला. जे आरोग्यमंत्री होते त्यांचे घोटाळे समोर आले आहेत. त्यामुळेच भाजपचा त्यांना विरोध होता. मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आधीचा भ्रष्टाचार समोर आणणार असतील तर आम्ही स्वागत करू, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी कौतुक केले.

Devendra FadnavisEknath Shinde Tanaji Sawant
Ajit Pawar : आरोपी सापडत नाही म्हणून स्वतःच्या घराच्या काचा फोडणार का? अजितदादांचा वसंत मोरेंना सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com