
Kolhapur News : कोल्हापूरातील विशाळगडावर असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. येथे असणाऱ्या मलिक रेहाण दर्गावरून हिंदुत्ववादी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी हा दर्गा आणि येथील अतिक्रमण त्वरित हटवण्याची मागणी लावून धरली आहे. याप्रमाणे आता पहिला धक्का वनखात्याने देण्याचे ठरवले असून तसे आदेशच वनमंत्री गणेश नाईक यांनी वन विभागाला दिले आहेत. वनमंत्री नाईक यांनी, येथील वनखात्याच्या जागेवर असणारी सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता विशाळगडावर असलेले अतिक्रमण हटवले जाणार आहे.
वनमंत्री गणेश नाईक ‘किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणांमुळे गडाचे पावित्र्य नष्ट होत आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे तातडीने काढावीत. ती जमीनदोस्त करावीत, असे आदेश दिले आहेत. विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी याबाबत मागणी केली होती.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
तसेच याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांना भेटून किल्ले विशाळगडावरील वनखात्याच्या जागेवरील अतिक्रमणांचा मुद्दा मांडला होता. यानंतर आता नाईक यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
नाईक यांनी याबाबत वनखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक शौमिता विश्वास यांच्यासह वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत. यावेळी गडावरील वन खात्याच्या जमिनीवर अतिक्रमणे झाली आहेत. ती निघाली पाहिजेत, गडाचे पावित्र्य जतन झाले पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच विशाळगडावरील अतिक्रमणे तातडीने वनविभागाने जमीनदोस्त करावीत. किल्ल्यांचे विद्रुपीकरण होणार नाही, याची दक्षता वनविभागाने घ्यावी, असेही आदेश वन मंत्री नाईक यांनी दिले आहेत. याबैठकीत वन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणांबाबत वनविभागाने आढावा घेण्याचे आदेश वन मंत्री नाईक यांनी दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.