Washim Family Death Mystery Sarkarnama
महाराष्ट्र

Washim family death case : महाराष्ट्र हादरला! पतीने पत्नीसह पोटच्या लेकींचे हात बांधून विहिरीत ढकललं अन् स्वतःचं आयुष्यही संपवलं

Washim Family Death Mystery : इंद्रायणी आणि दोन्ही मुलांचे मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्याचे सांगितले जात असून ही बाब समोर येताच गावात एकच चर्चा सुरू झाली. माहिती मिळताच शिरपूर जैन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील तपास सुरू केला.

Jagdish Patil

Washim News, 14 Jun : वाशिम जिल्ह्यातील तिवळी गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून या प्रकरणाचे गूढ अद्याप कायम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बकाल (वय 35) यांनी पत्नी इंद्रायणी बकाल (वय 28), मुलगी जान्हवी (वय 7) आणि मुलगा सोहम (वय 5) यांना विहिरीत फेकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर संतोष यांनी स्वतःही महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीवन संपवल्याचे समोर आले आहे.

इंद्रायणी आणि दोन्ही मुलांचे मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्याचे सांगितले जात असून ही बाब समोर येताच गावात एकच चर्चा सुरू झाली. माहिती मिळताच शिरपूर जैन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील तपास सुरू केला.

मात्र, बहीण इंद्रायणीसह दोन चिमुकल्याचा आणि जावाई संतोष बकाल यांचा मृत्यू ही झाल्याने आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. इंद्रायणी यांचे भाऊ सुधाकर इंगोले यांनी हा प्रकार केवळ आत्महत्येचा नसून त्यामागे इतर काही कारण असू शकते, असा दावा केला आहे.

तसेच संपत्तीच्या वादातून संतोष यांचा त्यांच्या भावासोबत वारंवार वाद होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढण्यास नकार दिला असून शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील निष्कर्षांनंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले आहे. सध्या या प्रकरणातील मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून संपूर्ण वाशिम जिल्ह्याचे लक्ष पोलिस तपासाकडे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT