Shiv Sena UBT Faces Crisis Workers : एकनाथ शिंदे निधी देतात, काम देतात, तुम्ही काय देता? अंबादास दानवेंसमोर शिवसेना ठाकरे सेनेतील कार्यकर्त्यांचा संतापाचा स्फोट

Anger erupts within Uddhav Thackeray Shiv Sena workers openly question leadership during key party review meeting Latur : लातूर जिल्ह्यात झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या संघटनात्मक आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी थेट नेतृत्वालाच धारेवर धरत जोरदार नाराजी व्यक्त केली.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray party crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे. लातूर जिल्ह्यात झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या संघटनात्मक आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी थेट नेतृत्वालाच धारेवर धरत जोरदार नाराजी व्यक्त केली.

या बैठकीला मराठवाडा संपर्कप्रमुख आणि आमदार अंबादास दानवे उपस्थित होते.

शनिवारी झालेल्या या बैठकीत एका तालुकाप्रमुखाने थेट सवाल करत वातावरण तापवले. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे निधी देतात, विकासकामे देतात, त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्याकडे जात आहेत. पण तुम्ही आम्हाला काय देता? पक्ष अशाने वाढणार कसा? असा थेट प्रश्न उपस्थित होताच बैठकीत एकच गोंधळ उडाला.

या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये (Worker) शाब्दिक चकमक सुरू झाली. काहींनी गद्दारांचे नाव कशाला घेता? असा आक्षेप घेत बाचाबाची सुरू केली. परिस्थिती हातघाईवर जाण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर अंबादास दानवे यांनी स्वतः मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

Ambadas Danve
Tukaram Mundhe MCOCA action : गुटखा सिंडिकेटवर ‘मकोका’चा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक

गोंधळ शांत झाल्यानंतर दानवे यांनी कार्यकर्त्यांची मते ऐकून घेतली. मात्र त्यावेळी त्यांना पक्ष निधी देऊ शकत नाही, पण मनापासून पक्षाचे काम करा, असे सांगण्याची वेळ आल्याने कार्यकर्त्यांमधील नाराजी अधिक स्पष्टपणे समोर आली.

Ambadas Danve
Farmer Loan Waiver Conditions : शेतकरी कर्जमाफीत अट का ठेवली? मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा

दरम्यान, एका ज्येष्ठ शिवसैनिकानेही नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “लोकसभा, विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमध्ये नेत्यांसाठी महाविकास आघाडी असते, पण कार्यकर्त्यांच्या वाट्याला मात्र बिघाडी येते. तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ दिले जात नाही. मग पक्ष विस्तारणार तरी कसा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या संपूर्ण बैठकीत कार्यकर्त्यांच्या नाराजीपुढे अंबादास दानवे काही काळ निरुत्तर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. लातूरमधील या घडामोडींमुळे ठाकरे सेनेतील वाढती अस्वस्थता पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com