Eknath Shinde  sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंना नेमकं झालंय तरी काय; डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

Political News : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील मूळगावी दरे येथे मुक्कामी आहेत. सत्तास्थापनेच्या लगबगीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आले असताना गावी आल्यानंतर त्यांची तब्येत बरी नसल्याचे समोर येत आहे.

Sachin Waghmare

Eknath shinde health report : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. बहुमत मिळाले असल्याने महायुतीमधील घटक पक्षात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच पहावयास मिळाली. त्यातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील मूळगावी दरे येथे मुक्कामी आहेत. सत्तास्थापनेच्या लगबगीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आले असताना गावी आल्यानंतर त्यांची तब्येत बरी नसल्याचे समोर येत आहे. (Eknath Shinde News)

तब्येत बरी नसल्याने शिंदे हे शनिवारी दिवसभर घराबाहेर पडलेले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले. काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) गुरुवारी दिल्लीला जावे लागले होते. शिंदे हे दिल्लीतील बैठक करून परतल्यानंतर साताऱ्यातील दरे गावी पोहचले. त्यातच त्यांची प्रकृती बरी नसल्याचे समजते. त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना नेमके काय झाले? त्याची अपडेट दिली.

मुख्यमंत्री शिंदे यांना ताप आला आहे. त्यांना 99 डिग्री ताप असून सर्दी झाल्यामुळे त्यांच्या घशाला इन्फेक्शन झाले आहे. व्हायरल संक्रमण त्यांना झाले असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. त्यांना सलाइन लावण्यात आले आहे. शुक्रवारी दरे या गावी गेल्यापासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. आता बरीच सुधारणा झाली आहे. शनिवारी त्यांनी डॉक्टरासोबत चर्चा केली. सध्या चार डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. रविवारी ते मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करीत असलेल्या डॉ. आर. एम. पार्टे यांनी दिली.

महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर शिंदे सरळ सातारामधील आपल्या दरे गावी पोहचले. शुक्रवारी मुंबईत होणारी महायुतीची बैठकही रद्द करावी लागली. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. परंतु शिंदे यांच्या शिवसेनेकडून हा दावा फेटाळण्यात आला.

दुसरीकडे, राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला लागले. त्यामध्ये महायुतीला बहुमत मिळाले आहे. दुसरीकडे भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमत असतानाही महायुतीकडून सरकार स्थापन करताना दिरंगाई होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, दुसरीकडे शनिवारी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराजीनाट्यावर पडदा पडली असल्याची चर्चा सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT