Narendra Modi: भल्याभल्यांचे अंदाज चुकले; पण, पीएम मोदींची 'ती' मुंबईतील भविष्यवाणी खरी ठरली

Political News : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणार आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकीतील प्रचार सांगता सभेवेळी केलेली भविष्यवाणी अखेर खरी ठरली आहे. त्यामुळे त्याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे.
narendra modi (1).jpg
narendra modi (1).jpgsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. बहुमत मिळाल्याने येत्या काळात राज्यात महायुतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणार आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकीतील प्रचार सांगता सभेवेळी केलेली भविष्यवाणी अखेर खरी ठरली आहे. त्यामुळे त्याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. (Narendra Modi news)

मुंबईत महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा शिवाजी पार्कच्या मैदानावर पार पडली होती. या सभेला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीचे ज्येष्ठ नेतेमंडळी उपस्थित होते. या सभेवेळी बोलताना पीएम मोदी (Narendra Modi) यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार येणार असल्याची भविष्यवाणी करीत शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रणच सर्वांना दिले होते. पीएम मोदींनी केलेली ही भविष्यवाणी खरी ठरली असल्याने त्यामुळे सध्या याची चर्चा जोरात रंगली आहे.

narendra modi (1).jpg
BJP Politics : शिंदेंची भाजपकडून आणखी कोंडी, चार मंत्र्यांच्या समावेशाला आक्षेप

विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची १४ नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी पार्कवर सभा पार पडली. या सभेत त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला. तसेच महायुतीचे (Mahayuti) परत सत्तेत येणार असल्याचा दावा करत मतदान, निकालाआधीच मुंबईकरांसह महाराष्ट्रातील जनतेला थेट शपथविधीचे निमंत्रण देऊन टाकले होते.

narendra modi (1).jpg
Bjp News : जालन्यातून भाजप कोणाला मंत्रीपद देणार? पाचव्यांदा आमदार झालेल्या लोणीकरांचे नाव आघाडीवर

मुंबई बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताचे शहर आहे. पण आघाडीत एक असा पक्ष आहे, ज्याने बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट दिला आहे. एकदातरी राहुल गांधीच्या मुखातून बोलवून दाखवा की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. हे असं झाल ना, तुम्हांला खुप चांगली झोप येईल. तुम्हांला हॉस्पिटलमध्ये जायची गरज लागणार नाही. सावरकरांना शिव्या देणाऱ्या लोकांना पण ते मिठी मारतात, असा टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला होता.

narendra modi (1).jpg
Bjp News : अहेरी विधानसभेत भाजप बॅकफूटवर; राष्ट्रवादीच्या एंट्रीने अस्तित्वच धोक्यात !

मुंबईचा जोश कधी थंड नाही पडत आणि म्हणून 20 तारखेला रेकाँर्ड ब्रेकची जबाबदारी मी तुम्हाला देऊन जात आहे. हा जोश कायम टिकवून ठेवायचा आहे. महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करायचे आहे अन त्यासोबतच शपथग्रहणाची तयारी करायची आहे. माझ्या निवडणुकीच्या सभा कमी आहेत. पण जेव्हा सरकार येईल, त्यांच्या शपथविधीचे निमंत्रण द्यायला आज आलोय, असा आत्मविश्वासही मोदींनी यावेळी बोलून दाखवला होता. ही मोदी यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे.

narendra modi (1).jpg
Assembly Election Results : महाराष्ट्रातील आकडे बदलणार? काँग्रेसनं केलं मोठं काम, आता निर्णय आयोगाच्या हाती

20 नोव्हेंबरला पार पडलेल्या निवडणुकीत मतदारानी महायुतीला भरभरून मतदान केले. त्यानंतर 23 नोव्हेंबरला पार पडलेल्या मतमोजणीत महायुतीने बाजी मारली. राज्यातील विधानसभा निवडणुकीत 288 पैकी महायुतीला 235 जागा मिळाल्या आहेत. भाजपने सर्वाधिक 132 जागांवर विजय मिळवला. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर बाजी मारली होती.

महायुती सरकारला बहुमत मिळाल्याने आता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. पीएम मोदींची ही भविष्यवाणी खरी ठरल्याने त्याची सध्या जोरात चर्चा सुरु आहे.

narendra modi (1).jpg
Assembly Election News : उमेदवारीसाठी भाजपची साथ सोडली; 'त्या' डझनभर नेत्यांचं पुढं काय झाले ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com