Bjp News : जालन्यातून भाजप कोणाला मंत्रीपद देणार? पाचव्यांदा आमदार झालेल्या लोणीकरांचे नाव आघाडीवर

Political News : वजनदार खाती मिळावीत, यासाठी मुंबईत तीनही पक्षाच्या नेत्याने लॉबिंग सुरू केले आहे. त्यातच आता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या जालना जिल्ह्यातून भाजप कोणाला संधी देणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Babanrao Lonikar
Babanrao Lonikar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीच्या प्रमुख नेत्याची दिल्लीत सत्तास्थापनेसाठी बैठक पार पडली. त्यामध्ये मुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार, हे निश्चित झाल्यानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महत्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीमधील नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे, वजनदार खाती मिळावीत, यासाठी मुंबईत तीनही पक्षाच्या नेत्याने लॉबिंग सुरू केले आहे. त्यातच आता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या जालना जिल्ह्यातून भाजप कोणाला संधी देणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. परतूर मतदार संघातून पाचव्यांदा आमदार झालेल्या बबनराव लोणीकरांचे नाव आघाडीवर आहे. (Bjp News)

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 134 जागा भाजपने (BJP) जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या वाट्याला 20 ते 22 मंत्रिपद येण्याची शक्यता आहे. भाजपकडे मुख्यमंत्रिपद जाणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे आता भाजपमधील आमदारांसाठी मोठी संधी आहे. जालना जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे सहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे जालना जिल्हा महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असल्याचे चित्र आहे.

Babanrao Lonikar
Mahayuti Government : महायुतीमधील तीन पक्षांना मिळणार ‘ही’ खाती?; वजनदार खात्यांसाठी मुंबईत आमदारांचे लॉबिंग

जालना जिल्ह्यातून भाजपचे तीन आमदार निवडून आले आहेत. त्यामध्ये परतूरमधून माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar), भोकरदन मतदारसंघातून संतोष दानवे, बदनापूर मतदारसंघातून नारायण कुचे यांनी हॅट्ट्रिक केली आहे. हे तिघे जण विजयी झाले आहेत. मराठवाड्यात सर्वात सिनियर आमदार असलेले व गेल्या 40 वर्षांपासून भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करीत असलेले बबनराव लोणीकर हे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी मंत्रीपदासाठी दावा केला आहे.

Babanrao Lonikar
Mahayuti News : लाडक्या बहिणींना सत्तेतही मोठा वाटा मिळणार? महायुतीकडून महिला आमदारांना 'गिफ्ट'!

गेल्या 40 वर्षात शंभर रुपयाचा मी अपहार केला नाही. चाळीस वर्ष निष्कलंक राहणं साधीसुधी गोष्ट नाही. मला मंत्रि‍पदाची संधी मिळावी, अशी मागणी भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. परतूर येथील भाजप कार्यकर्त्यांच्या आभार मेळाव्यात आमदार लोणीकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे साकडे घातले आहे.

Babanrao Lonikar
Bjp News : अहेरी विधानसभेत भाजप बॅकफूटवर; राष्ट्रवादीच्या एंट्रीने अस्तित्वच धोक्यात !

महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता व्यथित झाला होता. शेवटी राज्य समोर संकट होतं. उद्धव ठाकरेंचं सरकार भ्रष्ट होते. गृहमंत्रीचं पैसे वसूल करत होते. अन्याय अत्याचार होतं होते. साधू संतांना रस्त्यामध्ये मारलं जातं होतं. माझ्यावरही एक खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुडाचं राजकारण केले, असा आरोपही लोणीकर यांनी केला.

Babanrao Lonikar
Bjp News : 'बच्चू कडू विश्वासघातकी, त्यांना महायुतीत घेऊ नये'; भाजपच्या 'या' बड्या नेत्यानं टाकला बॉम्ब

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com