Mahadev Jankar News : भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवलेल्या महादेव जानकर यांनी विधानसभेला मात्र भाजपप्रणित महायुतीची साथ सोडली आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार राज्यातील विविध मतदारसंघात उभे केले होते. तर आता विधानसभेच्या निकालानंतर जानकर यांनी आपण महायुतीची (Mahayuti) साथ का सोडली याचा खुलासा केला आहे.
आपणाला महायुतीचा खूप वाईट अनुभव आल्यामुळेच मी त्यांच्यातून बाहेर पडल्याचं वक्तव्य जानकर (Mahadev Jankar) यांनी केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी आपण काँग्रेसबरोबर जाणार नसल्याचंही जानकरांनी स्पष्ट केलं आहे. "मला अद्याप काँग्रेसचा अनुभव नाही, त्यामुळे त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका असेल", असं ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या एकमेव आमदाराला देखील कारवाईचा इशारा दिला आहे. जानकर म्हणाले, "माझ्या पक्षाचा राज्यात सध्या एकच आमदार आहे. आगामी काळात कोणासोबत जायचं याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, जर त्या आमदाराने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांना दिला आहे.
तसंच यावेळी त्यांनी आपणाला अद्याप काँग्रेसचा (Congress) अनुभव नाही. त्यामुळे आता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका घेतल्याचंही स्पष्ट केलं. दरम्यान, यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी EVM मध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्याचा दावा केला.
ते म्हणाले, "EVM वर माझा आक्षेप असून देशभरात EVM विरोधात आंदोलन करणार आहे. ईव्हीममुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे. EVM हॅक करता येत, मी स्वतः इंजिनिअर आहे त्यामुळं मला सगळं माहीती आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळं याला लोकशाही म्हणता येणार नाही."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.