Rajiv Kumar Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election : हरियाणाची निवडणूक जाहीर, महाराष्ट्राची का नाही? आयोगाने सांगितले कारण...

Rajanand More

New Delhi : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आयोगाकडून केवळ जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर का करण्यात आले नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्रकार परिषदेतही महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत प्रश्न विचारण्यात आला. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकावेळी जाहीर करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये यापूर्वी एकाचवेळी मतदान झाले होते.

हरियाणा 3 नोव्हेंबर तर महाराष्ट्र सरकारची 26 नोव्हेंबरला मदुत संपत आहे. यंत्रणेची आवश्यकता पाहता जम्मू काश्मीरमध्ये अधिक लागणार आहे. त्यामुळे आम्ही जम्मू आणि काश्मीर, हरियाणा या दोन राज्यांत निवडणुका जाहीर केल्या, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात सध्या पाऊसही आहे. बीएलओचे काम सुरू आहे. तसेच गणेशोत्वव, पितृपक्ष, नवरात्र आणि दिवाळी असे सणही आहेत. त्यामुळे दोन राज्यांतच निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्याचेही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीनंतरच मतदान होणार असल्याचे संकेत आयोगाकडून देण्यात आले आहेत.

जम्मू-काश्मीर, हरियाणामध्ये कधी निवडणूक?

जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यांतील 25 सप्टेंबर आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हरियाणामध्ये एकाच टप्प्यात 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांतील मतमोजणी 4 ऑक्टोबर रोजी होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT