eknath shinde uddhav thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : टोले, खिल्ली, कोपरखळ्या...एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू धू धुतले!

Eknath Shinde Criticized uddhav Thackeray winter session :'निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट केले की काम करणाऱ्यांना संधी देते आणि घर बसणाऱ्यांना कायम घरी बसवते.', असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Roshan More

Eknath Shinde News: नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. कायदा सुव्यवस्था, लाडकी बहीण याबाबत प्रश्न विचारणाऱ्या अंबादास दानवेंना शिंदेंनी जोरदार उत्तर देताना नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले.

'निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट केले की काम करणाऱ्यांना संधी देते आणि घर बसणाऱ्यांना कायम घरी बसवते.', असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच काही लोक आले होते. पर्यटन करण्यासाठी ते येतात आणि परत जातात, असे म्हणत ठाकरेंना टार्गेट केले.

उद्धव ठाकरे नागपूर आले होते त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर ठाकरे पुन्हा मुंबईला परत आले. त्यावरून शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना 'अंबादास तुम लडो मै बुके देके जाता हूं', असे म्हणत खिल्ली उठवली. तर, विधानसभेच्या निकालावरून तूफान में कश्तियां और घमंड में हस्तियां डूब जाती हैं, असे उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला.

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही अडीच वर्षाच्या काळात दहा वर्षांचे काम केले. आम्ही जेवढ्या कल्याणकारी योजना आणल्या त्या कोणीही आणल्या नाही. विकासकामे केली. अंबादास हे देखील आम्ही विकासकामे केल्याचे मान्य करतील पण उघडपणे बोलणार नाहीत.

काही प्रकल्पांमध्ये विलंब झाला तो कोणामुळे ते पाहा. विकासाकामात स्पीड ब्रेकर लावणारे कोण होते? विकासाच्या विरोधात कोण होते? हे पाहण्याची आवश्यकता होती. जनतेने आम्हाला अडीच वर्षांच्या कामाची पोहोचपावती दिली, असे देखील शिंदे म्हणाले.

विरोधकांची उठवली खिल्ली

पराभवाचे खापर हे ईव्हीएमवर फोडले जात आहे. मात्र, ईव्हीएमची चर्चा विरोधकांपेक्षा मीडियात जास्त आहे. विधान भवनात प्रश्न मांडण्यापेक्षा विरोधक विधान भवन परिसरात असतात. विधान भवनाचे आवर हा मनोजरंजनाचा कट्टा नाही. आपण या ठिकाणी का आलोय? जबाबदारी काय आहे? जनतेनी आपल्याला येथे पाठवले आहे? हे गांभीर्याने घेतले पाहिजे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT