ग्रामीण भागातील तरुणांना प्रशासकीय कामाचा प्रत्यक्ष अनुभव, उच्च शिक्षणास पूरक कौशल्ये आणि विद्यावेतन या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. जिल्हा परिषदेकडून ‘जिल्हा परिषद फेलोशिप प्रोग्रॅम’ हा नवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत समाजकल्याण विभागातून २५ आणि सर्वसामान्य विभागाकडून २५ अशा एकूण ५० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून, त्यांना जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे.
फेलोशिप कार्यक्रमासाठी सिंबायोसिस विद्यापीठाकडून पब्लिक पॉलिसीचा विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वर्षभर या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाणार असून, अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सिंबायोसिसकडून प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती; मात्र प्रमाणपत्राची सुविधा नव्हती. यंदा मात्र प्रशिक्षणासोबत अधिकृत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फेलोशिपसाठी अभियांत्रिकी पदवीधर किंवा एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाणार असून, त्यामध्ये प्रशासकीय आकलन, धोरणात्मक विचार आणि सामान्य ज्ञान यांची चाचणी घेतली जाणार आहे. ही परीक्षा जून महिन्यात ‘एमकेसीएल’मार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा २५ हजार रुपयांचे विद्यावेतनही दिले जाणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांनाही उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष प्रशासकीय अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. काम करताना मिळणारा अनुभव, सिंबायोसिसचे प्रमाणपत्र आणि प्रशासकीय क्षेत्रातील नेटवर्किंग यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला मोठी दिशा मिळणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
जिल्हा परिषदेत सध्या मुख्यमंत्री फेलोशिप अंतर्गत काही जण काम चांगले काम करत आहेत. त्याच धर्तीवर पुणे फेलोशिप प्रोग्रॅम आखण्यात आला. विद्यार्थ्यांचे शिक्षणही पूर्ण होईल आणि कामाचे पैसेही मिळतील. शिवाय त्यांच्याकडील कौशल्याचा प्रशासनालाही फायदा होईल. याबाबत सिंबायोसिसशी करार करण्यात येणार असून, त्यांनी अभ्यासक्रम तयार केला आहे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमधील विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, पंचायत विद्यार्थ्यांना काम करता येणार शनिवार आणि रविवारी अभ्यासक्रमांतर्गत वर्ग राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अभ्यासक्रमादरम्यान विविध विषयांवरील व्याख्याने, केस स्टडी, धोरण विश्लेषण आणि क्षेत्रभेटींचाही समावेश
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.