Cabinet Decision Reserved category : खुल्या गटातील उमेदवारांसाठी गुडन्यूज : फडणवीस सरकारने बदलले राखीव जागांचे नियम

Maharashtra government reservation rules 2026 : महाराष्ट्र सरकारने सरकारी नोकरीतील राखीव जागांच्या नियमांत मोठा बदल केला आहे. वयोमर्यादा किंवा शुल्क सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही.
Maharahtra Mantralay
Maharahtra Mantralay sarkarnama
Published on
Updated on

खुल्या गटातील उमेदवारांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारी भरती प्रक्रियेतील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल मंजूर करण्यात आले. या नव्या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना भरतीमध्ये अधिक संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या नव्या नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील जे उमेदवार वयमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा परीक्षा देण्याच्या संधीमध्ये सवलत घेतात, त्यांची नियुक्ती आता केवळ राखीव जागांवरच केली जाणार आहे. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही. यापूर्वी अनेकदा सवलतींचा लाभ घेतलेल्या उमेदवारांना खुल्या गटातून नियुक्ती मिळत असल्याची चर्चा होती. त्यामुळे खुल्या गटातील उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण होत होती.

Maharahtra Mantralay
New SOP Maharashtra government : PM मोदींच्या आदेशानंतर महाराष्ट्र सरकार अॅक्शन मोडमध्ये : अधिकाऱ्यांच्या प्रवासापासून ते हॉटेलमधील मेन्यूबाबत SOP जाहीर

सरकारच्या या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील रिक्त जागा अधिक प्रमाणात खुल्या गटातील उमेदवारांसाठी उपलब्ध राहतील, असे मानले जात आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि समान संधी राखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

याच बैठकीत राज्यातील मृदा व जलसंधारण विभागासाठीही मोठा निर्णय घेण्यात आला. विभागातील विविध कामांसाठी तब्बल 8767 पदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर सरकारी भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बेरोजगार तरुणांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे.

दरम्यान, आश्रमशाळांमधील शिक्षकांसाठीही सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विजाभज प्रवर्गातील खासगी अनुदानित निवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना चट्टोपाध्याय आयोगानुसार लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार 12 आणि 24 वर्षांची नियमित सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणी लागू होणार आहे.

Maharahtra Mantralay
New Kerala Chief Minister : राहुल गांधींच्या विश्वासातील दोन दिग्गजांना मागे टाकून मारली बाजी : केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा जबरदस्त राजकीय प्रवास

या निर्णयामुळे राज्यातील अनेक शिक्षकांना आर्थिक लाभ मिळणार असून त्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय सकारात्मक मानला जात आहे.

सरकारच्या या तिन्ही निर्णयांमुळे सरकारी भरती, शिक्षकांचे वेतन आणि प्रशासनातील धोरणांमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः खुल्या गटातील उमेदवारांसाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात असून, आगामी भरती प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com