ZP School Teacher Recruitment Sarkarnama
महाराष्ट्र

ZP School: निवडणूक संपताच झेड.पी. शाळांमध्ये शिक्षकांची मेगा भरती; किती जागा भरणार?

ZP School Teacher Recruitment: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शिक्षक भरतीचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया सुरु करण्याबाबतच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्या शाळांमध्ये सुमारे १५ हजार १५८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

Mangesh Mahale

ZP School Jobs: नगरपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक संपताच झेड.पी शाळांमध्ये शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना साठी गुड न्यूज मिळणार आहे. निवडणुकांमध्ये सध्या राज्यात आचारसंहिता सुरु आहे. ही आचारसंहिता संपल्यानंतर झेड.पी. शाळांसाठी मेगा भरती होणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषद शाळेत सध्या किती शिक्षक आहेत. किती जागा भरणे आवश्यक आहे. याबाबतची जिल्हानिहाय माहिती मागवण्याचे काम सध्या सुरु आहे. नुकताच टीईटी परीक्षेचा निकाल लागला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका संपल्यावर रिक्त जागांवर भरतीबाबत विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. पवित्र पोर्टलवरुन ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शिक्षक भरतीचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया सुरु करण्याबाबतच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्या शाळांमध्ये सुमारे १५ हजार १५८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

झेड. पी शाळांमधील ८० टक्के रिक्त पदे भरण्यात येणार आहे. शाळांमध्ये ८ हजार पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती आहे. याबाबत प्रशासनाकडून विविध माहिती संकलीत करण्यात येत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. फेब्रुवारी-मार्चपासून शिक्षक भरतीला सुरुवात होणार आहे.

  • राज्यात एकूण ६३००० जिल्हा परिषदेच्या शाळा आहे.

  • या शाळेत एकूण १.९८ लाख शिक्षक शिकवतात.

  • त्यातील १५,१५८ पदे रिक्त आहेत.

  • यातील ८००० पदांसाठी भरतीचे नियोजन आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT