Devendra Fadnavis  Sarkarnama
मुख्य बातम्या

CM Devendra Fadnavis झाले 'गुरूजी' : IAS अधिकाऱ्यांची होणार 100 मार्कांची 'परीक्षा'

Maharashtra CM Devendra Fadnavis is set to test IAS officers प्रशासनातील वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंतच्या सर्व सनदी अधिकाऱ्यांची 100 गुणांची परीक्षा पार पडणार आहे. ज्यांची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहील त्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत.

Hrishikesh Nalagune

Devendra Fadnavis : प्रशासनाचा कारभार गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यासाठी ते नवनवीन कल्पनाही राबवत आहेत. 100 दिवसांचा कृती आराखडा, अधिकारी आणि सचिवांच्या नियुक्तीपूर्वी मुलाखती असे उपक्रम आतापर्यंत राबवण्यात आले आहेत. आता प्रशासनातील वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंतच्या सर्व सनदी अधिकाऱ्यांची 100 गुणांची परीक्षा पार पडणार आहे. ज्यांची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहील त्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. यामुळे सध्या सगळे सचिव दर्जापासूनचे अधिकारी या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी स्वतः या आराखड्याबाबतच्या बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर आता याच कृती आराखडा कार्यक्रमावर आधारित 100 गुणांची परीक्षा पार पडणार आहे. सर्व सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व अन्य प्रमुख पदांवरील आयएएस अधिकाऱ्यांसाठी ही परीक्षा असणार आहे. आपल्या विभागात अधिकाऱ्यांनी कोणत्या सुधारणा केल्या, 100दिवसांच्या कृती कार्यक्रमाची कशी अंमलबजावणी केली यावर आधारित मुद्यांवर 100 गुण देण्यात येणार आहेत.

या मुद्द्यांवर होणार परीक्षा :

केंद्र सरकारशी संबंधित प्रश्नांचा कसा पाठपुरावा केला जात आहे? कोणते प्रश्न कितपत सुटले? केंद्रीय योजनांचा किती निधी मिळविला? कार्यालयातील स्वच्छता नियमित होते का? जुन्या आणि निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावली आहे का? जुन्या फायलींचा निपटारा झाला आहे का? नव्या कर्मचाऱ्यांना कसे प्रशिक्षित केले जाते? सर्व सामान्य जनतेच्या तक्रारींचे निवारण कसे केले जाते?

गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करण्यासाठी कितपत पोषक वातावरण तयार केले आहे? व्यापारी, कामगार तसेच गुंतवणूकदारांच्या अडचणी कशा सोडविता? पालक सचिवांनी त्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्याला महिन्यातून एक दिवस भेट दिली का? विविध प्रकल्पांना भेट देऊन अडचणी दूर केल्या का? अशा विविध आठ मुद्यांना प्रत्येकी 10 गुण असणार आहेत. तर विभागात राबविलेल्या किमान 2 नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी २० गुण देण्यात येणार आहेत. याचा गुणतक्ता भरून मुख्य सचिव कार्यालयाकडे पाठयचा असून त्याची शहानिशाही केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT