Uddhav Thackeray and CM Shinde  Sarkarnama
मुलाखती

Uddhav Thackeray: मुंब्रा शाखा कुणाची? आमच्याकडे सगळी कागदपत्रे, ठाकरे गट न्यायालयात...

Mumbra News:सरकार म्हणून जो कारभार सुरू आहे तो घातक आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: मुंब्रा येथील ठाकरे गटाची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आल्यानंतर काल (शनिवारी) उद्धव ठाकरे यांनी शाखेला भेट दिली. यावेळी हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंब्रा शाखा कुणाची यावरून सध्या वाद रंगला असताना ठाकरे गट उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.

मुंब्रा शाखा कुणाची, याबाबत कागदपत्र तपासण्याचे काम ठाकरे गटाकडून सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली. लवकरच ठाकरे गट याबाबत उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे समजते.

काल मुंब्रा शाखेला ठाकरेंनी भेट दिली तेव्हा आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार संजय राऊत आणि इतर ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, आजच्या प्रकरणातून महाराष्ट्राची हतबलता संपूर्ण महाराष्ट्राने पाहलेली आहे. यात मी पोलिसांना दोष देत नाही कारण, सरकार म्हणून जो कारभार सुरू आहे तो घातक आहे.

"सरकारने पोलिसांना वारकऱ्यांवर हल्ला करायला लावला होता. याच सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पाशवी पद्धतीने लाठीहल्ला करायला लावला होता. आणि याच पोलिसांना आज चोरांचं रक्षण करायला लावलं. यापूर्वी अशी नामुष्की पोलिसांवर यापूर्वी महाराष्ट्रात कधीच आली नाही. आज मी स्वतः का आलो की,यांच्या सत्तेचा माज मला पहायचा होता," असे ठाकरे म्हणाले.

आमच्याकडे त्या शाखेचे सगळी कागदपत्र..

ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "हे नामर्द सरकार तर आहेतच पण यांनी सत्तेचा आधार घेऊन हे अत्याचार करतायेत. जेथे वीस ते पंचवीस वर्ष सुरू असलेली शिवसेनेचा शाखा पाडली आणि खोके सरकारने तिथे खोका आणून टाकला. पण हे डबडं आम्ही जागेवर ठेवणार नाही. आमच्याकडे त्या शाखेचे सगळी कागदपत्र आहेत,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT