Jayant Patil On Ncp Ceremony
Jayant Patil On Ncp Ceremony  Sarkarnama
मुंबई

Jayant Patil On Ncp Ceremony : '२५ वर्षे लहान कालखंड नाही, अनेक क्रांतीकारी निर्णय..' ; वर्धापन दिनाला जयंत पाटील म्हणाले..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आज १० जून रोजी साजरा होत आहे. पक्षाने २४ वर्षपूर्ण करून आता रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या २५ वर्षांच्या कालखंडात पक्षाने अनेक चढ- उतार पाहिले, यश-अपयश पाहिले. या एवढ्या वर्षात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकहाती पक्षाचं नेतृत्व केले आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राष्ट्रवादीने नुकताच गमावला, या साऱ्या प्रवासाबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. (Jayant Patil On Ncp Ceremony)

जयंत पाटील म्हणाले, "२५ वर्ष हा कालखंड लहान नाही, पण मर्यादित कालखंड आहे.महाराष्ट्र राज्यात अनेक क्रांतिकारक निर्णय शरद पवार मुख्यमंत्री असताना घेतले.राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर निर्णय घेतले होते. हा पक्ष राज्यातील प्रमुख पक्ष आहे. ज्या पक्षावर टीका केल्याशिवाय सत्तेत बसलेल्यांना एक ही दिवस जात नाही, असा आमचा पक्ष आहे. "

'भारतातील एक अनुभवी नेतृत्व आपल्याकडे आहे. शरदपवार साहेबांवर विकृत वक्तव्य केली जात आहेत. आमच्या विरोधकांना इतर पक्ष महत्वाचा वाटत नाही. आपला पक्ष छत्रपती शिवाजी महाराज, शाहू -फुले - आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे. त्याच विचाराने पक्षाची पुढची वाटचालही असेल, पण आज आपण पाहतो, राज्यात जातीय-धार्मित तेढ निर्माण केली जात आहे. वातावरण अशांत करून राजकीय पोळी भाजली जात आहे.गेल्या दीड दोन महिन्यात तणावाचे वातावरण तयार करत आहे. याचा अर्थ एकच निवडणूक जवळ आली आहे, यांना धार्मिक ध्रुवीकरणातून मतांचं राजकारण करायचं आहे," असेही पाटील म्हणाले.

"आम्ही महाराष्ट्र दंगेमुक्त ठेवू, यासाठी आमच्या पक्षाचा कार्यकर्ता पुढे राहील, राज्यात शांतता राहावी यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. मात्र आज कोणी वादग्रस्त स्टेटस ठेवतं, कोणी तलवारी बाहेर काढतं, यामुळे वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न काहीजण करतात अशी अवस्था राज्यात कधी नव्हती, "अशी खंत ही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT