Jayant Patil, Mahebub Shaikh News
Jayant Patil, Mahebub Shaikh News Sarkarnama
मुंबई

Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसचे 'मिशन' अहमदनगर; जयंत पाटील म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

NCP meeting Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झाली. राज्यातील व देशातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेची तपशीलवार माहिती त्यांनी दिली.

जयंत पाटील म्हणाले, यापुढे 'एक तास राष्ट्रवादीसाठी' या उपक्रमावर अधिक भर देण्यात येईल तसेच बूथ कमिट्या अधिक सक्षम करण्यासाठी विभागीय स्तरावर काही नेत्यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या माध्यमातून या कमिट्या मजबूत करण्यात येतील. तसेच पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रीयाही सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा ३४९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्यावतीने राज्यभरात राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तसेच १० जून रोजी पक्ष २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यासाठी अहमदनगर येथे भव्य सभा घेण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

दरम्यान, या बैठकीत राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर महत्वाची जबाबदारी देण्यात आली. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी दोन क्रमांकावर आहे, त्या विभागाची जबाबदारी नेत्यांना दिली आहे. यामध्ये कोकणची जबाबदारी सुनिल तटकरे, ठाणे-पालघरची जबाबदारी जितेंद्र आव्हाड तर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी एकनाथ खडसे यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT