CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray  sarkarnama
मुंबई

मंत्रीमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका; औरंगाबाद, उस्मानाबादसाठी ऐतिहासिक दिवस

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचे (ShivSena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह बंड केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर सध्या अडचणीत आहे. राज्यापालांनी गुरुवारी बहुमत चाचणी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्या विरोधात सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णयांचा धडाकाच लावला.

यामध्ये अनेक दिवसापासून मागणी असलेल्या औरंगाबाद शहराचे नामकरण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. औरंगाबाचे नाव "संभाजीनगर" करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

उस्मानाबाद शहराच्या ''धाराशीव" नामकरणास मान्यता.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.

राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार.

कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार

अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार

ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.

विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.

निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय

शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT