Mumbai News: आरक्षणाच्या मागण्यांसाठी राज्यात आंदोलन-उपोषणाचे सत्र सुरूच आहे. अशातच आता शिक्षक भरतीचा मुद्दा तापला आहे. शिक्षक भरती लवकरात लवकर करण्यात यावी, या मागणीसाठी एका तरुणाने थेट मंत्रालयात सुरक्षा जाळीवर उडी मारत आंदोलन केले आहे.
या तरुणाने मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारत आंदोलन केल्याने मंत्रालयात मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या तरुणाला ताब्यात घेतले. गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक भरती रखडलेली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी आक्रमक पावित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर राबण्यात यावी, तसेच कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया घेण्यात येऊ नये, अशा मागण्या या युवकाने केल्या आहेत. या मागण्यांसाठीच मंत्रालयातील संरक्षण जाळीवर या तरुणाने उडी मारत आंदोलन केले. या तरुणाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर मंत्रालयामध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला तातडीने ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी कंत्राटी भरती संदर्भात राज्य सरकारने एक जीआर काढला होता. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्व स्थरांतून मोठा विरोध झाला. विरोधकांनीही सरकारला या निर्णयावरून चांगलचं घेरलं होतं. त्यानंतर आता एका तरुणाने थेट सुरक्षा जाळीवर उडी मारत आंदोलन केल्याने शिक्षक भरतीचा प्रश्न तापण्याची शक्यता आहे.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.