Amit Thackeray, Aaditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : दोन प्रिन्स 24 तासांत ठाणेकरांच्या भेटीला; एक गरजले, दुसरे शांतपणे निघून गेले

Pankaj Rodekar

Thane Political News :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन ठरले आहे. कारण 24 तासांत ठाकरे घराण्यातील दोन युवराज ठाण्यात आले. यातील एक युवराज आक्रमक शैलीत व्यासपीठ गाजवून गेले, तर दुसरे युवराज काहीही न बोलता निघून गेले.

यातील पहिले युवराज होते आदित्य उद्धव ठाकरे आणि दुसरे युवराज होते अमित राज ठाकरे. आणि दोघांनीही आपापल्या शैलीने ठाणेकरांकडे मतांचा जोगवा मागितला.

ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे शहर. कोपरी-पाचपाखाडी हा एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ. अशा या ठाण्यात रविवारी ठाकरे गटाचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आले होते.

त्यांनी ठाकरी भाषेत विरोधकांचा समाचार घेत मैदान मारले होते. त्यानंतर काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे ठाण्यात (Thane) दाखल झाले. त्यांनी पाहिले आणि ते निघून गेले. कार्यक्रमात भाषण न करता तसेच प्रसारमाध्यमांशी न बोलता मने जिंकण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

आदित्य ठाकरे रविवारी ठाण्यात आले होते. या वेळी त्यांनी शाखांना भेटी देतानाच मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात नवीन शाखेचे उद्घाटन केले. त्या-त्या ठिकाणी जाहीर सभेत ठाकरी भाषेत विरोधकांवर आसूड ओढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

त्यानंतर सोमवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून अमित ठाकरे (Amit Thackeray) आले होते. मनसेने गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी ते आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी आदित्य ठाकरेप्रमाणे अमित ठाकरे खणखणीत ठाकरे भाषेत भाषण करतील, असे वाटले होते. मात्र,अमित ठाकरे ठाण्यात आले, त्यांनी पाहिले आणि ते निघूनही गेले. प्रसारमाध्यमांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. पण काहीही न बोलता ते निघून गेले.

या दोन्ही युवराजांनी आपापल्या पक्षासाठी ठाणेकरांकडे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मतांचा जोगवा मागितला. मात्र, एका नाण्याच्या कशाप्रकारे दोन बाजू असतात हे या युवराज ठाकरे बंधूंच्या रूपाने पाहण्यास मिळाले.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT