Maratha Reservation : मोठी बातमी ! मराठा आरक्षण विधेयक मंजूर; पण तरीही जरांगे पाटील आंदोलनावर ठाम

Manoj Jarange Patil On Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे 'सगेसोयरे' या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News: मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी 'सगेसोयरे' या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. या मागणीवर आज कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून पुन्हा एकदा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचं सांगितलं. (Assembly special session 2024)

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे 'सगेसोयरे' या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा सर्वेक्षण अहवाल आल्यानंतर राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं होतं. या अधिवेशनात राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंजूर केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला जराही धक्का लागला तर... ; ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आक्रमक

राज्य सरकारने मंजूर केलेल्या 10 टक्के आरक्षणाच्या विधेयकावर मनोज जरांगे पाटील यांनी शंका उपस्थित करत हे विधेयक आरक्षण कोर्टात टिकेल का ? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच आम्हाला जे आरक्षण हवं आहे, ते आम्ही मिळवणारच आहोत, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत "हे आरक्षण कोर्टात टिकेल का, याबाबत आम्हाला शंका आहे. पण सरकारने दिलेल्या 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मात्र, आम्ही जी मागणी केली होती, ते आमच्या हक्काचं आरक्षण द्या, अन्यथा उद्यापासून (21 फेब्रुवारी) आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत.आम्हाला जे हवं ते आरक्षण आम्ही मिळवणारच आहोत, असं जरांगे पाटील म्हणाले.

'सगेसोयरे' या अधिसूचनेबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले ?

"कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकार गतीने काम करत आहे. मराठवाड्यात पुरावे शोधण्याचे कामदेखील सुरू आहे.'सगेसोयरे' याबाबतीत जी अधिसूचना सरकारने काढली होती, त्यावर तब्बल सहा लाख हरकती आल्या आहेत. त्या हरकतींची छाननी करण्याचं काम सुरू असून, त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. आज यांच्या डिटेल्समध्ये आपण जाणार नाही," असं मुख्यमंत्री म्हणाले.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Manoj Jarange Patil
OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला जराही धक्का लागला तर... ; ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com