OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला जराही धक्का लागला तर... ; ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आक्रमक

Maratha Reservation : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही - ओबीसी नेते
Eknath Shinde, Prakash Shendge, Manoj Jarange Patil
Eknath Shinde, Prakash Shendge, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Prakash Shendge Ultimatum :

मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरू आहे. तत्पूर्वी ओबीसी आरक्षणाचं काय होणार, याची चिंता ओबीसी नेत्यांना लागली आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांकडून गंभीर प्रतिक्रिया येत आहेत. त्यातीलच एक आहेत प्रकाश शेंडगे.

याच प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर कोर्टात जाऊ, याकडे प्रकाश शेंडगे यांनी लक्ष वेधले आहे.

Eknath Shinde, Prakash Shendge, Manoj Jarange Patil
Maratha Reservation : सगेसोयऱ्यांची भूमिका घ्या; नाही तर... जरांगेंचा मराठा आमदारांना इशारा

ओबीसींच्या आरक्षणाला (OBC Reservation) जरादेखील धक्का लागला तर ओबीसी समाज कुणालाही सोडणार नाही. आमच्या आरक्षणाला धक्का लावणाऱ्यांविरोधात ओबीसी समाज कोर्टात न्याय मागेल, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींमध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा शेंडगे यांनी दिला आहे. त्याचवेळी ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन का बोलावले नाही? तसेच आजच्या विशेष अधिवेशनामध्ये (Special Assembly Session) धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रस्ताव का घेतला जात नाही, असे प्रश्न प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान, राज्यातील मराठ्यांचे सर्वेक्षण सरकारने केले हे मान्य केले तर अवघ्या 11 कोटींच्या संख्येने असलेल्या मराठ्यांचे सर्वेक्षण केले यात वास्तव किती आणि बनवेगिरी किती, हे लवकरच उघडकीस येईल, याकडेही ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी लक्ष वेधले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण हवे, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. आम्ही स्वतंत्र आरक्षणाची मागणी केली नाही, अशी प्रतिक्रिया जरांगे-पाटील यांनी आज सकाळीच दिली आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, पण ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देऊ नका, ही ओबीसी नेत्यांची पहिल्यापासूनची मागणी आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Eknath Shinde, Prakash Shendge, Manoj Jarange Patil
Maharashtra Assembly Session LIVE Updates : आम्ही शब्द पाळतोय! जरांगेंच्या उपोषणावर एकनाथ शिंदे विधिमंडळात बोलले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com