Aaditya Thackeray, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray News : मुख्यमंत्री ही दादागिरी का सहन करत आहेत? हा पॅटर्न आहे का?

Mahayuti Government Guardian Ministers Shiv Sena CM Devendra Fadnavis : आदित्य ठाकरे यांनी दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यानंतर सरकारवर निशाणा साधला आहे.

Rajanand More

Mumbai News : पालकमंत्र्यांच्या नियुक्त्याच्या निर्णयानंतर काही तासांतच दोन नियुक्त्यांना स्थगिती देण्याची नामुष्की महायुती सरकारवर ओढवली आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सवाल केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करून फडणवीस यांना तुम्ही दादादिरी का सहन करत आहात, असा प्रश्न विचारला आहे. ठाकरेंनी म्हटले आहे की, नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या घोषणेला काल रात्री स्थगिती देण्यात आलीय. हे नक्की काय चाललंय? मुख्यमंत्री परदेशी असताना अशी स्थगिती येणं आणि पालकमंत्री म्हणून जाहीर केलेल्या मंत्र्यांचा अपमान होणं हे विचित्र आहे.

पहिल्यांदाच ‘सह पालकमंत्री’ आणि मग स्थगिती ही संकल्पना मंत्रिमंडळात आली आहे. मंत्रिपद मिळवूनदेखील काही स्वार्थी गद्दार मंत्री मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत आहेत. पालकमंत्री पद, बंगले ह्यावर भांडण्यापेक्षा जनतेची सेवा करा, थोडीतरी लाज बाळगा, असे टीकास्त्र ठाकरेंनी सत्ताधारी शिवसेनेतील मंत्र्यांवर सोडले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं संख्याबळ असूनही मुख्यमंत्री ही दादागिरी का सहन करत आहेत? जाळपोळ, दादागिरी मंत्र्यांचेच काही लोकं करणार आणि एवढी मोठी जबाबदारी स्थगित होणार? हा पॅटर्न आहे का?, अशा प्रश्नांची सरबत्ती ठाकरेंनी केली आहे.

दुसरीकडे बीड आणि परभणीची जनता न्यायासाठी आक्रोश करत असताना, ती जनता मात्र अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. मंत्री आपला स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत, मुख्यमंत्री मंत्र्यांची भांडणं- मानापमान ह्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं हित मात्र दुर्लक्षित होतंय, अशी खंतही ठाकरेंनी व्यक्त केली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT