
Solapur, 20 January : विजय वडेट्टीवारसाहेब, आधी आपला पक्ष कसा संपला हे बघा. आपल्या पक्षाचा किती अस्तित्व शिल्लक आहे, याचा विचार करा. एकनाथ शिंदे हे मातीतून उगवलेलं नेतृत्व आहे, जनतेतून आलेलं नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांना संपवण्याचा दम कोणामध्येच नाही, असा पलटवार शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केला आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील वीस आमदार घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत हे भाजपसोबत जाणार आहेत, असा गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार यांनी केला होता. वारंवार नाराज होणाऱ्या एकनाथ शिंदे यांना कंटाळून भाजपने हे पाऊल उचलेले आहे, असेही त्यांनी म्हटले होते. त्याला शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांनी उत्तर दिले आहे.
वाघमारे म्हणाल्या, आपलं नेतृत्व जर एवढं सक्षम होतं, तर निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला एवढा मोठा फटका का बसला, त्याचं थोडं तरी आत्मपरीक्षण विजय वडेट्टीवार साहेबांनी (Vijay Wadettiwar) करावं. एकनाथ शिंदे हे मातीतून उगवलेलं नेतृत्व आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व संपवण्याचा दम कोणाच्या मध्येही नाही. लाडका भाऊ म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी लाडकी बहीण योजना आणली किंवा मुलींचे शिक्षण मोफत केलं, असे अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदेंचे नेतृत्व दिवसेंदिवस बहरत जाईल.
एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळगावी गेले की लोकांना उगीचच असं वाटतं की ते नाराज आहेत. पण, बारीक सारीक कारणांवरून नाराज होऊन कुठेतरी असं निघून एकांतात जावं, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व हे एकनाथ शिंदे यांचं अजिबात नाही. त्यांना आपल्या मातीची ओढ आहे आपल्या गावाची ओढ आहे शेतीची ओढ आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्या माणसांमध्ये आणि आपल्या शेतीच्या मातीमध्ये रमायला तिथे जातात, त्यामुळे अशा पद्धतीच्या अफवा जर कोणी पसरवत असतील ते चुकीचे आहे.
महायुती सरकार भगिनींना दिलेली ओवाळणी परत घेणार नाही
बहिणीला दिलेली ओवाळणी परत घ्यायची नसते आणि हे आमच्या लाडक्या बहिणींना माहिती आहे. अदिती तटकरे यांनी सांगितलं की, महाराष्ट्र सरकार हे सक्तीने पैसे अजिबात परत घेणार नाही. ज्या महिला निकषात बसत नसतील, तर त्यांनी जर स्वतःहून पैसे परत केले, तर ठीक आहे. पण, भगिनींना दिलेली ओवाळणी परत घ्यावी, असं आमचं महायुती सरकार नक्कीच नाही, असेही ज्योती वाघमारे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.