Uday Samant : 'वडेट्टीवारांचा वेगळा खटाटोप, वेळ आल्यावर...'; उदय सामंत यांचा 'इथिक्स' पाळून असल्याचा इशारा (पाहा VIDEO)

Minister Uday Samant Vijay Wadettiwar Sanjay Raut DCM Eknath Shinde ShivSena : काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेतील मंत्री उदय सामंत वेगळी भूमिका घेतल्याचे संकेतावर पलटवार केला आहे.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : 'उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना आणलं. आता एकनाथ शिंदेंना संपून नवीन 'उदय' पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल', असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. यावर उदय सामंत यांनी सामंत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

"सर्वसामान्य कुटुंबातील दोन लोकांना बाजूल करण्याचे षडयंत्र करू नका. तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना कितीवेळा भेटलात, याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे", असा इशारा उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांना दिला. तसंच संजय राऊत यांच्या राजकारणाला उदय सामंत यांनी बालिशपणा, असे म्हणत टोला लगावला.

मंत्री उदय सामंत म्हणाले, "विजयजी, मी आणि एकनाथ शिंदेसाहेब सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झालेलो आहे. सर्वसामान्य कुटुंबातील दोन लोक एकत्र असतील, तर त्यांना बाजूला करण्याचे षडयंत्र करू नका". तुम्ही भाजपमध्ये (BJP) येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना कितीवेळा भेटलात, याची पूर्ण माहिती माझ्या आहे, अशा इशारा उदय सामंत यांनी दिला.

Uday Samant
Sanjay Raut : सैफवरील बांगलादेशीचा चाकूहल्ला, हा रहस्यमयी प्रकार; संजय राऊतांना भाजप काहीतरी लपवत असल्याची शंका

'मी राजकीय इथिक्स पाळतो. ते पाळत असताना मी समोरच्याची बदनामी करणार, याची काळजी घेतो. एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी फालतू षडयंत्र करू नये, हीच माझी सूचना आहे. संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) करत असलेले विधानं खोटं आहेत, असेही उदय सामंत यांनी म्हटले.

Uday Samant
Top 10 News : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी मोठी घडामोड; रायगड-नाशिक पालकमंत्री पदावरून वाद - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

संजय राऊतांचा हा राजकीय बालिशपणा...

संजय राऊत यांनी केलेलं विधान पूर्णपणे खोटं आहे असून, हा राजकीय बालिशपणा आहे. एकनाथ शिंदेंनी जो राजकीय उठाव केला, त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो आणि त्यामुळे मला दोनदा राज्याचे उद्योगमंत्रीपद मिळालं, याची मला जाणीव आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसारख्या मोठ्या नेत्यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात घडवण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत, ते मी कधीही विसरणार नाही. माझे आणि एकनाथ शिंदेंचे संबंध राजकीय पलीकडचे आहे. त्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही, असेही उदय सामंत यांनी म्हटले.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते...

'शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट झाली आहे.एकनाथ शिंदे यांची गरज संपली का? ते बाजूला व्हावे अशी भीती आहे. उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदे यांना आणल आहे. आता एकनाथ शिंदेंना संपून नवीन 'उदय' पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल', असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

संजय राऊत काय म्हणाले होते...

दावोसला मंत्री उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत, अशी माझी माहिती असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. हे भविष्यात सगळे पक्ष फोडतील, शिंदे गट देखील फोडतील, अजित पवार गट देखील फोडतील, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com