Abu Azmi Sarkarnama
मुंबई

Abu Azmi : विधानसभेत कारवाईची मागणी होताच अबू आझमींकडून औरंगजेबबद्दलचं 'ते' वक्तव्य मागे; म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज.."

Abu Azmi Aurangzeb Controversy : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी "औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता", असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद मंगळवारी (ता. 04) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत उमटल्याचं पाहायला मिळालं.

Jagdish Patil

Mumbai News, 04 Feb : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी "औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता", असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद मंगळवारी (ता. 04) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget session) दुसऱ्या दिवशी विधानसभेत उमटल्याचं पाहायला मिळालं.

अबू आझमी (Abu Azmi) यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. यामुळे विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, औरंगजेबाच्या असल्या औलादी रस्त्यावर नेऊन ठेचल्या पाहिजेत, त्यांना सभागृहात घ्यायला नाही पाहिजे, असं म्हणत भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी आझमी यांच्यावर हल्लाबोल केला.

तर औरंगजेबाची बढाई मारणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. अबू आजमी वर कारवाई करायला हवी अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते गुलाबराव पाटील यांनी केली. दरम्यान, आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील सत्तादारी आमदारांनी लावून धरली. त्यामुळे आज विधीमंडळाचं आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

विधानसभेतील सत्ताधारी आमदारांचा संताप पाहता अबू आझमी यांनी देखील अखेर आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. त्यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी माझ्या वक्तव्याची मोड-तोड करून दाखवल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, इतिहासकारांनी, लेखकांनी जे आपल्यासमोर मांडलं आहे तेच वक्तव्य मी औरंगजे यांच्याबाबत केलं आहे.

मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह कोणत्याही महापुरुषा संदर्भात कोणत्याही प्रकारचं अपमानजनक वक्तव्य केलेलं नाही. मात्र, माझ्या वक्तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी वक्तव्य मागे घेतो. माझ्या वक्तव्याला राजकीय मुद्दा बनवलं गेलं आणि माझ्या वक्तव्यामुळे विधीमंडळाचं अधिवेशन तहकूब होणं ही राज्यातील जनतेसाठी चांगली गोष्ट नाही." असं म्हणत त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे.

अबू आझमींच्या या वक्तव्यामुळे पेटला वाद

"चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरं बनवली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती.", असं वक्तव्य अबू आझमी यांनी केल्यामुळे नव्या वादाला सुरूवात झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT