Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळ यांनीकेली धनंजय मुंडेंची पाठराखण, म्हणाले, राजीनामा नकोच!

Chhagan Bhujbal; Bhujbal sports Dhananjay Munde on resignation issue-माजी मंत्री छगन भुजबळ पुन्हा एकदा वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांच्या मदतीला धावून आले आहेत.
Chhagan Bhujbal, Anjali Damaniya & Dhananjay Munde
Chhagan Bhujbal, Anjali Damaniya & Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Bhujbal on Munde: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार बॉम्बिंग केले. त्यांनी पुन्हा एकदा मोठा आरोप केला आहे. त्यामुळे मंत्री मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला.

सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आज त्यांनी पुन्हा एकदा कृषी खात्यातील एका भ्रष्टाचाराला वाचा फोडली. त्यानंतर लगेचच मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भेट घेतली.

Chhagan Bhujbal, Anjali Damaniya & Dhananjay Munde
Sanjay Raut Politics: संजय राऊत यांनी फडणवीस प्रकरणावरून शिंदेंच्या मंत्र्याला दिले थेट आव्हान!

मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विविध संस्था आणि राजकीय नेत्यांनी दबाव वाढविला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ यांनी राजीनामा द्यावा काय? यावर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मंत्री मुंडे यांची बाजू घेतली आहे.

माजी मंत्री भुजबळ यांनी यासंदर्भात पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेण्यात सक्षम आहे. ते या संदर्भात काय करायचे ते करतील. मात्र मंत्री मुंडे यांनी राजीनामा देऊ नये, असे माझे मत आहे.

माजी मंत्री भुजबळ म्हणाले, माझ्यावर देखील असेच आरोप झाले होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या अखत्यारीत असलेल्या `सीबीआय`ने माझ्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र पुढे आरोप पत्र सादर करताना त्यात माझं नाव देखील आलं नव्हतं. मात्र या सर्व कारवाईत जनमानसात माझ्याविषयी विविध चर्चा घडली.

मला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे गुन्हा सिद्ध होईपर्यंत मंत्र्याचा राजीनामा घेणे योग्य नाही, असे माझे मत आहे. त्यामुळेच मंत्री मुंडे यांच्या बाबत ज्या काही चौकशी सुरू आहेत, त्याचा तपास पूर्ण होऊ दिला पाहिजे. त्यामध्ये काही तथ्य आढळले, तरच मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असे भुजबळ म्हणाले.

सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी, छगन भुजबळ हे मुंडे यांच्या राजीनाम्यानंचर त्यांची खुर्ची केव्हा रिकामी होते, याची वाट पहात आहेत. असे विधान केले होते. त्याबाबत भुजबळ यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. श्रीमती दमानिया यांना काय म्हणायचे, ते म्हणू द्या. मी मात्र मुंडे यांनी राजीनामा द्यावा आणि ती जागा रिकामी व्हावी, असा विचार कधीही करीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com