Abu Azmi latest statement : समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं. अबू आझमींच्या वक्तव्यांवर सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील आमदारांकडून जोरदार टीका सुरू होती आणि त्यांच्याविरोधात केसेसही दाखल केल्या गेल्या. शिवसेनेने आझमींविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच अबू आझमी विरोधात देशद्रोहाचा खटला चालवला जावा अशी मागणी केली होती. कारवाईची मागणीही सुरू असतानाच आज (बुधवार) अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आलं.
या निलंबनाच्या कारवाईमुळे प्रचंड नाराज झालेल्या अबू आझमी यांनी अखेर एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आणि भूमिकाही मांडली. यावेळी अबू आझमींच्या पाठीमागे भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसत होता.
अबू आझमी(Abu Azmi) यांनी म्हटले की, विधिमंडळाचं कामकाज चालवं, यासाठी मी जे काय म्हणालो ते मागे घेण्याबाबत बोललो. मी काही चुकीचं तर नाही बोललो. तरीही जो गदारोळ सुरू आहे आणि सभागृहाचं कामकाज थांबवलं जात आहे. सभागृह चालवं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात काही काम व्हाव. मी सभागृहाच्या बाहेर जे काही म्हणालो होतो, ते मागे घेण्याबाबतही बोललो. परंतु तरीही मला निलंबित केलं गेलं.
समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे म्हणून कौतुक केले होते. औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा ही अफगाणिस्तानपर्यंत होती. जीडीपी 24 टक्के एवढा होता. भारताला त्यावेळी 'सोने की चिड़िया', असे म्हटले जात होते. असे असताना चुकीचे म्हणू का? असा सवाल अबू आझमी यांनी केला होता.
अबू आझमी एवढ्यावर थांबले नाहीत तर, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर औरंगजेबची लढाई झाली, ती राज्य कारभाराची होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कधीच धर्माची लढाई झाली नाही. मी धर्माची लढाई मानत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.