Farhan Azmi News : अबू आझमी आधीच वादात असताना, आता त्यांच्या मुलानेही गोव्यात घातला राडा, जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

Abu Azmi latest controversy : आधीच आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत.
Farhan Azmi
Farhan AzmiSarkarnama
Published on
Updated on

Goa police FIR Farhan Azmi :आधीच औरंगजेबचं कौतुक केल्यामुळे समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. असे असताना आता अबू आझमींचा मुलगा फरहान आझमी देखील त्याच्या एका कारनाम्यामुळे चर्चेत आला आहे. त्यामुळे सध्या आझमी पिता-पुत्रावर टीका सुरू आहे.

मुघलशासक औरंगजेबाचे कौतुक केल्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे(Samajwadi party) नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी वादात सापडले असताना, आता त्यांच्या मुलाने गोव्यात राडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. इंडिकेटर न दाखवता कारने दिशा बदलल्यामुळे कांदोळी येथे सोमवारी (०३ मार्च) रात्री मोठा वाद झाला. याप्रकरणी पोलिसांनी अबू आझमींच्या मुलासह इतरांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Farhan Azmi
Nashik Pune semi high-speed rail : 'नाशिक-पुणे सेमी हायस्पीड' रेल्वे मार्गाबाबतच्या सर्वपक्षीय कृती समितीत प्रकल्पाचे प्रवर्तक शिवाजीराव आढळराव पाटीलच नाही!

कळंगुट पोलिसांनी याप्रकरणी झीऑन फर्नांडिस, जोसेफ फर्नांडिस, फरहान आझमी आणि इतरांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १९४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार झालेल्या प्रकारानंतर पोलिसांनी फरहान आझमीसह इतरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, बीएनएस ३५ अंतर्गत नोटीस जारी करुन त्यांची सुटका करण्यात आली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फरहान आझमी मर्सिडीज जी -वॅगन गाडीतून कांदोळी भागातून जात असताना त्यांच्या कारने न्यूटन सुपर मार्केट येथे इंडिकेटर न दाखवता वळण घेतले. यावरुन मोठा वाद झाला. स्थानिकांनी आझमी यांच्या कारभोवती एकत्र येत मोठा गोंधळ घातला. दरम्यान, आझमी यांनी त्यांच्याकडे परवाना असलेली बंदूक आहे असं सांगत बंदुकीचा धाक दाखवला, असा दावा केला जात आहे. यामुळे वाद आणखी चिघळला.

Farhan Azmi
Congress workers protest : काँग्रेस कार्यकर्त्यांचा नागपूर महापालिकेच्या आवारात राडा; कुंड्या फेकत व्यक्त केला रोष!

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फरहान आझमी यांच्यासह आणखी काही जणांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न देखील झाला. दरम्यान, कळंगुट पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत चारजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. कळंगुट पोलिस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्वांना एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याची संधी देण्यात आली पण, त्यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. तसेच, वैद्यकीय तपासणीसाठी देखील नकार दिला. फरहान आझमी यांनी त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीचा परवाना दाखवला. हा परवाना गोव्यासाठी(GOA) लागू असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

दरम्यान, आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी मुघल शासक औरंगजेबाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. विधानसभेत देखील यावरुन मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वक्तव्य आझमी यांनी केलं होतं. यावरुन सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले होते. तसेच, आझमी यांच्याविरोधात सर्व स्तरातून टीका झाली. अबू आझमींनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com