A tragic accident on the Kalyan–Murbad highway has raised fears of nine fatalities. Rescue operations are underway as authorities assess the situation. sarkarnama
मुंबई

Accident : महामार्गावर रक्ताचा सडा, प्रवासी वाहतूक करणाऱ्या 'इको'चा चुराडा, मृत प्रवाशांचा आकडा वाढला, तब्बल 11 जण...

Accident Kalyan–Murbad Highway : कल्याण मुरबाड मार्गावर रायते गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. सिमेंट मिक्सर ट्रक आणि प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या इको (काळी पिवळी) मध्ये हा जबरदस्त अपघात झाला.

शर्मिला वाळुंज

Accident News : कल्याण -मुरबाड - नगर महामार्गावर रायते गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. सकाळी 11 च्या दरम्यान हा अपघात झाल्या असून स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका सिमेंट मिक्सर ट्रक आणि प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या इको (काळी पिवळी) मध्ये हा जबरदस्त अपघात झाला आहे.

या अपघाताचे अतिशय भयावह असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही धडक इतकी भयानक आहे की यामध्ये इको गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. आणि गाडीतील तब्बल 9 प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त केली जात होती मात्र, हा आकडा वाढल्याची माहिती आहे.

या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत सर्व प्रवासी मुरबाडमधील रहिवाशी होते. कल्याणहून मुरबाडला जात होते. घाई घाईत पूल सुरू केल्याने अपघात झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पुलावर एकमार्ग सुरू असल्याने प्रशासनाने योग्य ती काळजी न घेतल्याने हा अपघात झाल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे

डीवायएसपी अनिल लाड यांनी सांगितले की, कल्याण-अहिल्यानगर हायवेर इको आणि टाटा मिक्सर यांच्यात अपघात झाला. अपघात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे मृतदेह रुग्णालयात आणले आहेत. 11 जणांचे मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती समजू शकलेली नाही. हा अपघात इतका भीषण आहे यातील प्रवासी वाचण्याची शक्यता फारच कमी असल्याचे अपघातानंतर तेथे पोहोचलेल्या ग्रामस्थांनी सांगितले.

डीवायएसपी अनिल लाड यांनी सांगितले की, कल्याण-अहिल्यानगर हायवेर इको आणि टाटा मिक्सर यांच्यात अपघात झाला. अपघात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे मृतदेह रुग्णालयात आणले आहेत. 11 जणांचे मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती समजू शकलेली नाही. हा अपघात इतका भीषण आहे यातील प्रवासी वाचण्याची शक्यता फारच कमी असल्याचे अपघातानंतर तेथे पोहोचलेल्या ग्रामस्थांनी सांगितले.

ह्रदय पिळवटून टाकणारे फोटो

अपघातानंतर गाडीतून मृत्यदेह बाहेर काढून महार्गावर ठेवण्यात आले होते. हे फोटो समोर आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

या अपघातामध्ये नेमकी चुकी कोणाची होती हा अपघात नेमका कसा झाला, प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते का? या देखील चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT