Samruddhi Highway Accident: सर्वात सुरक्षित आणि गतिमान म्हणून समृद्धी महामार्गाची गणना होते. इगतपुरी जवळ आज या महामार्गावर टँकर पलटला. या अपघाताने वाहतूक ठप्प झाली.
चार महिन्यांपूर्वी पुणे एक्सप्रेस वे वर धोकादायक रसायनांचा टँकर पलटी झाला होता. या अपघाताने टँकर सुरक्षितपणे हलविण्यास विलंब झाला. त्यामुळे हजारो वाहने अडकून पडली.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील या अपघाताने वाहतुकीचा गंभीर प्रश्न चर्चेला आला होता. एखादा एक रसायने आणि ज्वालाग्रही पदार्थांच्या वाहतुकीचा विषय चर्चेत आला. या संदर्भात शासनाने तातडीने उपाययोजना सुचविण्याचे आदेश दिले होते.
पुणे एक्सप्रेस वे वरील अपघाताची पुनरावृत्ती आज सकाळी इगतपुरीला झाली. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर ऑइल टँकर अनियंत्रित झाल्याने पलटी झाला. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र ऑइल पसरले.
या अपघातामुळे रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे टँकर बाजूला करून रस्ता सुरळीत करण्यास कालावधी लागला. त्यामुळे दोन तास वाहतुकीची कोंडी झाली. महामार्गावर पाच ते सहा किलोमीटरच्या अवजड वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
महामार्ग सुरक्षा पथकाने टँकर पर्यंत पोहोचून तातडीने रस्ता व्यवस्थित केला. सांडल्याने भरधाव वेगाच्या वाहनांना धोका निर्माण झाला होता. रस्त्यावर माती आणि झाडपाला टाकून उपाय योजना करण्यात आली.
समृद्धी महामार्गावरील या अपघाताची वरिष्ठ स्तरावर दखल घेण्यात आली आहे. संदर्भात महामार्ग पोलिसांनी नोंद केली आहे. तपासानंतर याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे महामार्ग प्रशासनाने सांगितले.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.