Crime of Bribery Sarkarnama
मुंबई

Crime of Bribery : मुंबई प्रामाणिक, तर नाशिक, पुणे, संभाजीनगर लाचखोरीत अव्वल!

Mumbai ranks eighth in state bribery : राज्यात लाचखोरीत नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात अव्वल ठरले आहे. तुलनेत आठ विभागांपैकी मुंबई प्रशासन प्रामाणिक दिसत असून, ते शेवटच्या स्थानी आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप सर्वाधिक कोठून होतात, तर ते मुंबईमधून होतात. राज्याचे प्रशासकीय केंद्र मुंबई आहे. तेथून राजकीय नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू असतात. परंतु हीच मुंबई प्रशासकीय सेवेत, लाचखोरीत शेवटच्या क्रमांकावर आहे.

पहिल्या क्रमांकावर नाशिक, दुसऱ्या क्रमांकावर पुणे आणि तिसऱ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर विभाग आहे. एकूण आठ विभागांपैकी मुंबई लाचखोरीत सगळ्यात शेवटच्या आठव्या क्रमांकावर आहे.

लाचलुचपत (ACB) विभागाने या वर्षाच्या सुरवातीला पहिल्या सात महिन्यातील कारवाईची आकडेवारी समोर आली. यात मुंबई विभागात लाचखोरीचे एकूण 21 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात 30 जणांना अटक झाली. याच काळात उर्वरित महाराष्ट्रात एकूण 433 गुन्हे नोंदवण्यात आले. त्यावरून मुंबई विभागातील लाचखोरीचे प्रमाण निव्वळ 4.62 टक्के इतके निघते. सात महिन्यांत 19 लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांना सापळा लावून पकडण्यात आले. अन्य मार्गाने अधिक संपत्ती गोळा केल्याबद्दल प्रत्येकी एक गुन्हा नोंदवण्यात आला. या कारवायांवरून मुंबईत कर्तव्य बजावणारे सरकारी अधिकारी राज्याच्या तुलनेत अधिक प्रामाणिक आहे, असा अंदाज निघतो.

नाशिक (Nashik) विभागात 96 गुन्हे दाखल झाले, त्याचे टक्केवारीतील प्रमाण 21.14 टक्के आहे. यानुसार नाशिक विभाग हा पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग आहे. तिथे 86 गुन्हे दाखल झाले असून, त्याचे 18.94 टक्के प्रमाण आहे. तिसऱ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर आहे. तिथे 76 गुन्हे दाखल झाले असून, 16.74 टक्के प्रमाण येते. एकूण आठ विभागांपैकी मुंबई विभाग लाचखोरीत सगळ्यात शेवटच्या आठव्या क्रमांकावर आहे.

लाचखोरीची सर्वाधिक प्रकरणे महसूल आणि पोलिस विभागाविरोधात नोंद होतात. प्रत्यक्षात दाखल प्रकरणे आणि स्वीकारलेली लाच याची सरासरी काढल्यास राज्यात महापालिका विभागातील अधिकारी, कर्मचारी सर्वाधिक लाच मागतात, स्वीकारतात, असे लाचलुचपत विभागाची आकडेवारी सांगते.

मुंबई कारवाई कमी असल्याची कारणं

मुंबई मेट्रो शहर आहेत. वेगवान शहर असल्याने खासगी सेवा घेण्याचा कल अधिक असतो. झटपट कामांसाठी अधिकाऱ्यांनी पैसे मागितले, तर गैर वाटत नाही. नागरिकांनी देखील पैसे देताना गैर वाटत नाही. काही वेळ लाच घेण्यास भाग देखील पाडले जाते. त्यामुळे तक्रारी कमी होतात. त्यामुळे मुंबईत लाचलुचपत विभागाची कारवाई कमी दिसते. विशेष म्हणजे, लाचलुचपत मुंबईत जनजागृती कमी दिसते. त्याचा देखील परिणाम असू शकतो, असे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT