Raj Nayani On Chitra Wagh sarkarnama
मुंबई

Chitra Wagh News : चित्रा वाघ यांच्याकडून 'पॉर्न स्टार' म्हणून उल्लेख; अभिनेत्यानं दिला इशारा...

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ( ठाकरे गट ) जाहिराती केल्या आहेत. यातील एका जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारनं अभिनय केल्याचा आरोप भाजप नेत्याचा चित्रा वाघ यांनी केला होता. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. आता अभिनेते राज नयानी यांनी चित्रा वाघ यांनी इशारा दिला आहे. तसेच, "कलावंत एखाद्या सिनेमात, मालिकेत काम करतो, तेव्हा त्याला त्या भूमिकेच्या मागणीनुसार अभिनय करावा लागतो," असं नयानी यांनी सांगितलं.

राज नयानी ( Raj Nayani ) म्हणाले, "मी एक चारित्र्यवान अभिनेता आहे. एका कलावंताचा अपमान केल्यामुळे चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी शब्द मागे घ्यावेत. तसेच, दोन दिवसांत माझी माफी मागावी. अन्यथा इच्छा नसतानाही मला त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा लागेल."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"माझी अब्रुनुकसानगी केली"

"चित्रा वाघ, या सुशिक्षित महिला आहेत. कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमात किंवा मालिकेत काम करतो, तेव्हा त्याला त्या भूमिकेच्या मागणीनुसार काम करावे लागते. त्यांनी माझ्या एका वेबसिरीजच्या भूमिकेतील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केला. त्यांच्या दाव्याची मी निंदा करतो. माझ्या अभिनयाला पॉर्न स्टारची उपमा देऊन त्यांची माझी अब्रुनुकसानगी केली आहे. त्यावर माझा आक्षेप आहे," असंही राज नयानी यांनी सांगितलं.

"वाघ यांनी दाखवलेले फोटो वेब सिरीजमधील"

"शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) जाहिरातील मी काम केलं आहे. त्यामुळे जाहिरातीत काम करणारा कलावंत पॉर्न स्टार असल्याचा शोध त्यांनी लावला. जे फोटो पत्रकार परिषदेत वाघ यांनी दाखवले, ते माझ्या एका वेब सिरीजमधील आहेत. तो वेब सिरीजमधील भूमिकेचा एक भाग होता," असं नयानी यांनी स्पष्ट केलं.

"माझ्या कुटुंबातील तीन व्यक्तींना गमावलं"

"चित्रा वाघ यांनी प्रतिमान मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मला मनस्ताप सहन करावा लागला आहे. फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी माझी प्रतिमा मलिन केली. मी माझ्या भावना लपवून हा व्हिडीओ शूट करतोय. मात्र, चित्रा वाघ यांच्या घाणेरड्या आरोपांनी कुटुंब व्यथित झालं आहे. आठ वर्षात मी माझ्या कुटुंबातील तीन व्यक्तींना गमावलं आहे. त्यातील दोघांना कोरोना काळात गमावलंय. आता आम्ही तीनच व्यक्ती कुटुंबात आहोत. मी एक वडील असून माझ्या दोन मुलांचं पालनपोषण करत आहेत. मात्र, एक राजकीय हेतूतून माझ्यावर आरोप करणं धक्कादायक आहे," असं नयानी यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT