लोकसभा निवडणुकीमुळे ( Lok Sabha Election 2024 ) देशासह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये उत्तर-प्रत्युत्तर सुरू आहे. यातच शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारनं अभिनय केल्याचा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कुठली संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहात? असा सवाल चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना उपस्थित केला आहे. त्या भाजप प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.
चित्रा वाघ ( Chitra Wagh ) म्हणाल्या, "आदुबाळ नाईट लाईफ लिमिटेड प्रोडक्शनच्या जाहिरातीमधील पात्र पॉर्नस्टार आहे. पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) करत आहेत. हा पॉर्नस्टार जाहिरातीमध्ये विचारतो की, 'महिलांवरील अत्याचार कधी थांबणार?' हाच पॉर्नस्टार लहान वयांच्या मुलींबरोबर अश्लील चित्रण करतो."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"या पॉर्न स्टारचे एका अॅपवरती मुलींबरोबर घाणेरडे कृत्य करतानाचे व्हिडीओ आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कुठली संस्कृती आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणाची? त्याच्या कंपनीचा आणि पॉर्नस्टारचा काय संबंध आहे?" असा प्रश्न चित्र वाघ यांनी विचारला आहे.
"हा पॉर्नस्टार एकीकडे मुलींबरोबर अश्लील चाळे करताना दिसतो. दुसरीकडे हा पॉर्नस्टार म्हणतो, 'महिलांवरील अत्याचार कधी थांबणार?' आदुबाळ नाईट लाईफ लिमिटेड प्रोडक्शनच्या जाहिरातींवर उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडावी. तसेच, केंद्र सरकारनं अशा अॅपवरती बंद घालावी. म्हणजे उद्धव ठाकरेंना, असे पॉर्नस्टार पुन्हा सापडणार नाहीत," असा घणाघातही चित्रा वाघ यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.