Aditi Tatkare Sarkarnama
मुंबई

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार..? आदिती तटकरेंनीच दिली माहिती

CM Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेचा निर्णय वाचला तर गोष्टी समजतील. ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतून लाभ घेतात, त्यांना एक हजार रुपये त्यातून मिळत असतात. सरकारी योजनांमधून कमीत कमी 1500 रुपये महिलांना मिळावे, असा त्यामागचा उद्देश आहे.

Deepak Kulkarni

Pune News : विधानसभा निवडणुकीत राज्यातील राजकारण फिरवलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' आता विविध कारणांमुळे सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. कधी विरोधकांचे आरोप तर कधी अपात्र महिलांची नवी अपडेट अशी अनेक कारणं आहेत. आता याचदरम्यान, या लाडकी बहीण योजनेतील (CM Ladki Bahin Yojana) पात्र महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.

महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर म्हणजेच 30 एप्रिल रोजी मिळणार असल्याची माहिती समोर खुद्द महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेचा सण लाडक्या बहि‍णींसाठी गोड होणार आहे. मात्र,एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की कमी होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सोमवारी (ता.21) लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याविषयीची माहिती दिली. कारण सरकारने लागू केलेल्या अर्ज पडताळणीचा फटका आतापर्यंत अनेक बहिणींना बसला आहे. त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा हप्ता मार्च महिन्याचा लाभ मिळालेल्या सर्व महिलांना मिळणार का? याकडे लाडक्या बहि‍णींचं लक्ष लागलं आहे.

मंत्री तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2 कोटी 47 लाख आहेत. ऑक्टोबर 2024 महिन्यात ज्यावेळी लाभ दिला होता. त्यावेळी 2 कोटी 33 लाख महिला होत्या. ही योजना राबवताना कुचराई होत नाही. ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ दिला जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच पहिल्यापासून निधी दिला जातो, असंही यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.

लाडकी बहीण योजनेचा निर्णय वाचला तर गोष्टी समजतील. ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतून लाभ घेतात,त्यांना एक हजार रुपये त्यातून मिळत असतात. सरकारी योजनांमधून कमीत कमी 1500 रुपये महिलांना मिळावे, असा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळं 1000 रुपये नमो शेतकरी आणि 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातात, असं आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT