Chandrakant Patil : माजी खासदार संजयकाकांसाठी भाजपचे दरवाजे बंद! चंद्रकांत पाटलांकडून माजी नाही, आजी खासदारांनाच ऑफर...

Chandrakant Patil On Sanjaykaka Patil and Vishal Patil : काहीच दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या घरी भेट दिली होती. यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होता.
Vishal Patil, Chandrakant Patil And Sanjaykaka Patil
Vishal Patil, Chandrakant Patil And Sanjaykaka Patil sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या राजकारणात माजी खासदार संजयकाका पाटील आणि खासदार विशाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधान आले होते. पण आता माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद झाल्याची माहिती खूद्द भाजपचे नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच त्यांनी ही ऑफर विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यासाठी खुली असून ती वारंवार दिली जाईल असेही स्पष्ट केले आहे. यामुळे पुन्हा एकदा सांगलीचे राजकारण ढवळून निघणार आहे.

माजी खासदार संजयकाका पाटील यांचा लोकसभेत विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी अपक्ष उभं राहत पराभव केला होता. यानंतर लगेच लागलेल्या विधानसभेवेळी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी भरली होती. मात्र तेथेही त्यांचा नवख्या रोहित पाटलांनी पराभव केला. यामुळे काहीसे नाराज झालेले संजयकाका राजकारणापासून बाजूला झाले होते.

दरम्यानच्या काळात भाजप कार्यकर्ता मेळाव्यात थेट व्यासपीठावर हजेरी लावत संजयकाकांनी आपले भाजप प्रेम दाखवून दिले होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ते आपले मित्र असल्यानेच येथे आल्याचे म्हटलं होते. तर मध्यंतरी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतरच संजयकाकांची घरवापसी होणार असल्याच्या चर्चांना उत आला होता. पण आता त्यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद असल्याचे धक्कादायक वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केल्याने खळबळ उडाली आहे. विद्यमान खासदार विशाल पाटील यांनाच भाजपे प्रवेशाची ऑफर दिल्यानेदेखील संजयकाका नाराज असल्याचे बोलले जात होते. तर आता चंद्रकांत पाटलांनी ही ऑफर सुरूच राहणार असल्याचे सांगत भाजपसाठी पहिली पसंद ही विशाल पाटीलच असतील असे स्पष्ट केले आहे.

Vishal Patil, Chandrakant Patil And Sanjaykaka Patil
Chandrakant Patil Statement : शिंदेंची दादांविरोधात शहांकडे तक्रार? चंद्रकांत पाटील म्हणतात, खळखळ व्यक्त केली नाही तर...

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. तिथेच त्यांचे पुनर्वसन केलं पाहिजे. ते आमचे जुने नेते व मित्र असल्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षातच पुनर्वसन करण्यासाठी आम्ही अजित पवारांना विनंती करू, अशी भूमिका मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली आहे. यामुळे आता संजयकाका पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनांच पूर्णविराम लागल्याचे आता समोर आले आहे.

एकीकडे गेल्या काही दिवसांपासून संजयकाका पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच त्यांना पूर्ण विराम देण्यात आला आहे. तर दुसरीकडे सांगलीचे विद्यमान अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची ऑफर आपण देतच राहू असेही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे विशाल पाटील आता या ऑफरवर कोणती भूमिका मांडतात याकडे काँग्रेससह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Vishal Patil, Chandrakant Patil And Sanjaykaka Patil
Chandrakant Patil : निलंबत फोंडेंसाठी पालकमंत्र्यांना साकडे; चंद्रकांत पाटील म्हणाले, 'ते कोल्हापूरचे, शिफारस...'

विशाल पाटलांचा भाजला नकार

दरम्यान मंत्रिपदाचे स्वप्न पाहणाऱ्या विशाल पाटलांनी दोनच दिवसांच्याआधी भाजची ऑफर नाकारत असल्याचे जाहीर केले होते. तसेच त्यांनी, आपण अपक्ष म्हणून निवडून आलो आहे आणि पुढची पाच वर्षे अपक्ष म्हणूनच राहणार आहे, अशी स्पष्टोक्ती दिली. तसेच त्यांनी, मी भाजपच्या विचारसरणीपासून कोसो दूर असून माझी विचारसरणी भाजपच्या विचारधारेकडे कधी वळेन, असे वाटत नाही. मात्र पुढची पाच वर्षे अशा प्रकारच्या चर्चा चालूच राहणार. त्याला काही इलाज नसल्याचेही त्यांनी म्हटलं होते. यामुळे सध्यातरी काँग्रेसची चिंता मिटली असून विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला विराम मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com