Aditya Thackeray News Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray News : भाजपच्या 'या' गोष्टींना बिनशर्त पाठिंबा आहे का? मनसेला आदित्य ठाकरेंचा सवाल!

Lok Sabha Election 2024 : "लोकसभेच्या चौथ्या टप्पापर्यंत भाजपने हिंदुत्वाचं नरेटीव्ह इतक्या प्रखरतेने मांडलं नाही. आता महायुतीसाठी राज ठाकरे यांच्याकडून हिंदुत्वाचं आक्रमक पवित्रा मांडला जातोय. "

Chetan Zadpe

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुतीला गुढीपाडवा मेळाव्यात बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर आता महायुतीच्या उमेदवारांकडून राज ठाकरे यांना सभांची मागणी होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी महायुतीसाठी राज ठाकरे यांच्या सभा पारही पडले. या सभांमधून राज ठाकरेंचा टीकेचे लक्ष्य उद्धव ठाकरे असल्याचे दिसून आले. मनेसेचा बिनशर्त महायुतीला पाठिंबा यावर आता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मनेसेच्या कार्यकर्त्यांना खुला प्रश्न विचारला आहे.

आदित्य ठाकरे यांनी नुकतीच एका यु ट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, "राज ठाकरे यांनी नुकतीच कळव्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा झाली आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्पापर्यंत भाजपने हिंदुत्वाचं नरेटीव्ह इतक्या प्रखरतेने मांडलं नाही. आता महायुतीसाठी राज ठाकरे यांच्याकडून हिंदुत्वाचं आक्रमक पवित्रा मांडला जातोय. त्यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा एक व्हिडिओही दाखवला. राज ठाकरेंकडून महायुतीसाठी मांडल्या जाणाऱ्या या गोष्टींचा काही प्रभाव पडेल, असं तुम्हाल वाटतं का?"

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावरे उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, "बघा, मी त्यांना कधीही उत्तर देत नाही. आमचं एक वेगळं नातं असल्यामुळे मी फारसं काही बोलत नाही. मात्र जे मनसेचे कार्यकर्ते आहेत. त्यांना मला एक महत्त्वाची गोष्ट विचारायची आहे. मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पण ही तीच भाजपा आहे, ज्यांनी महाराष्ट्रातले मोठे उद्योगधंदे गुजरातला पळवून नेले. वेदांता फॉक्सकॉन हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून (Maharashtra) उचलून गुजरातला नेला. यातून निर्माण होणारा महाराष्ट्रातला एक लाख रोजगार गुजरातला नेला. बल्क ड्रग पार्क गुजरातला नेला. मेडिकल डिव्हाईस पार्क गुजरातला नेला. एअरबस, सोलर पार्क, रिन्युएबल एनर्जी पार्क, टेक्सटाईल्स पार्क सगळं गुजरातला पळवून नेलं."

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पुढे म्हणाले, "एवढंच नाही आपला क्रिकेट वर्ल्ड कप फायनल सामना गुजरातला नेला. तर मनसेला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारायचं आहे, भाजपने केलेल्या या महाराष्ट्र विरोधी सर्व गोष्टींना त्यांचा बिनशर्त पाठिंबा आहे का? आज एवढी वर्षे मनसे भांडत होती. भूमीपुत्रांसाठी-मराठी माणसांसाठी, असं आम्हाला सांगितलं जात होतं. आज आपला भूमीपुत्र रोजगार मागत आहे. त्यांची स्वप्ने चिरडली जात आहेत. कारण महाराष्ट्राचे उद्योग धंदे चालले गुजरातला. या सर्व गोष्टींना मनसेच्या कार्यकर्त्यांचा बिनशर्त पाठिंबा आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT