Aditya Thackeray: पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. कोलकात्यात हा प्रकार घडला असून याचे पडसाद राज्यासह देशभरात उमटले आहेत. देशभरातून या प्रकाराचा निषेध करण्यात आला आहे. यावर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. यात ते म्हणतात, "खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेला हल्ला हा जगाला असा संकेत देतो की, आपल्या देशात लोकशाहीची अक्षरशः समाप्ती झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था एक तर हेतु पुरस्सर नियंत्रणात ठेवली जात नाहीये किंवा मग ती पूर्णपणे हाताबाहेर तरी गेली आहे. जर खासदारांच्याच सुरक्षेची हमी देता येत नसेल, तर जगातील इतर देश याकडे कोणत्या दृष्टीने पाहतील? गुंतवणूकदार आणि पर्यटक कसे पाहतील? आपल्या एकेकाळी लोकशाहीप्रधान असलेल्या व्यवस्थेसाठी ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे"
पश्चिम बंगालमधील सोनारपूर इथं अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याची घटना घडली. निवडणुकीतील हिंसाचारात जखमी झालेल्या टीएमसी कार्यकर्त्यांना भेटायला गेले असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. कार्यकर्त्याच्या घराजवळ पोहोचताच त्यांना काही तरुणांनी घेरलं यानंतर इथं मोठ्यानं घोषणाबाजी करत त्यांच्यावर जमावाकडून हल्ला करण्यात आला. जमावाकडून खासदार अभिषेक बॅनर्जींवर अंडी फेकण्यात आली तसेच त्यांचे कपडेही फाडण्यात आले. यानंतर सुरक्षारक्षकांनी अभिषेक यांना हेल्मेट घालून तिथून बाहेर काढले.
दरम्यान, या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, "हे लोक मला मारू इच्छित होते, त्यांनी माझा शर्ट फाडला. घटनास्थळी एकही पोलिस उपस्थित नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हेल्मेटमुळेच माझे डोके वाचले. परंतू, अशा हल्ल्यांना आम्ही घाबरणार नाही"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.