Tukaram Munde News: मोठी बातमी: तुकाराम मुंढेंचा गुटखा, पानमसाला विक्रेत्यांना दणका; एकाचवेळी पाच विभागांत 'सर्जिकल स्ट्राइक'

Maharashtra State FDA : राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्विकारताच राज्यातील अवैध धंद्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याविरुद्ध मुंढे यांनी अत्यंत आक्रमक आणि जोरदार मोहीम उघडली आहे.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhesarkarnama
Published on
Updated on

Pune News: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्विकारताच राज्यातील अवैध धंद्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याविरुद्ध मुंढे यांनी अत्यंत आक्रमक आणि जोरदार मोहीम उघडली आहे. याचाच एक भाग म्हणून काल, २९ मे रोजी प्रशासनाने एकाच दिवसात तब्बल ३३ आरोपींना अटक केली असून २८ आस्थापना सील केल्या आहेत. या धडक कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​एकाच वेळी 'सर्जिकल स्ट्राईक'

​आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांच्या थेट निर्देशानुसार, राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काल एकाच वेळी बृहन्मुंबई, कोंकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या पाच विभागांत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध मोठी कारवाई केली.

मुंढेंचे पुढचे पाऊल

या धडक मोहिमेदरम्यान विविध ठिकाणांवरून एकूण ६ लाख १७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्यभर अशी कडक कारवाई सुरू असतानाच, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कल्पक पुढाकारातून आता अन्न व औषधांबाबतच्या तक्रारींसाठी एक नवीन "अॅप" तयार केले जात असून, नागरिकांसाठी लवकरच टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तुकाराम मुंढे यांच्या थेट आदेशानुसार, राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी २९ मे रोजी बृहन्मुंबई, कोंकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध एकाच वेळी कारवाईचे सत्र राबवले. यामध्ये सर्वाधिक कारवाई कोकण विभागात झाली, जिथे तब्बल २० आस्थापनाविरुद्ध कारवाई करून २१ लोकांना अटक करण्यात आली.

Tukaram Mundhe
Narayan Rane News: जरांगेंचं उपोषण सुरू होताच नारायण राणेंची आक्रमक भूमिका,सरकारलाही धारेवर धरले; म्हणाले, 'मराठ्यांच्या प्रश्नांना...'

याशिवाय पुणे विभागात ८ ठिकाणी कारवाई करून ८ जणांना अटक करण्यात आली, तर बृहन्मुंबईत दोन ठिकाणी कारवाई करून दोघांना गजाआड करण्यात आले. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात प्रत्येकी १ कारवाई करत एकूण २ जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याचे कलम २६, २७, ३०(२) (a) आणि कलम ५९ अंतर्गत एफआयआर दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना कडक इशारा दिला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात खपवून घेणार नाही, असे स्पष्ट करत नागरिकांना शुद्ध अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात कुणी भेसळ केल्यास वा प्रतिबंधित पदार्थांची विक्री किंवा उत्पादन केल्याचे आढळल्यास यापुढे अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही त्यांनी दिला.

Tukaram Mundhe
Mahayuti Government: शिवसेनेच्या मंत्र्यानं थेट मोदींचाच आदेश धुडकावला? विमान,हेलिकॉप्टर प्रवास अन् ताफ्यातील गाड्यांचा आकडा समोर

आता खपवून घेणार नाही...

दरम्यान, अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका येताच नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे. तक्रार करतेवेळी नागरिकांनी स्वतःचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक, भेसळ केल्या जाणाऱ्या ठिकाणाचा वा आस्थापनेचा अचूक पत्ता आणि कोणत्या अन्नपदार्थात भेसळ केली जाते याची सविस्तर माहिती तक्रारीत नमूद करावी, जेणेकरून प्रशासनाला तात्काळ कारवाई करणे सोपे होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com