Aaditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray: रोहित पवार, किशोरी पेडणेकरांना ईडीच्या नोटीसा; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Jui Jadhav

Mumbai News: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी बुधवारी ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांना हे समन्स बजावण्यात आले.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांना बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणात ईडीकडून समन्स बजावण्यात आले. ईडीच्या या कारवाईवर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत ईडीने नोटीसा बजावल्या, यावरून भाजपसह शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली.

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर हे दोघेही दावोसला (स्वित्झर्लंड) गेले नाहीत म्हणून त्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. जर ते मुख्यमंत्री शिंदेंबरोबर गेले असते तर त्यांना या नोटीस आल्या नसत्या', अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी केली.

केवळ दबावतंत्राचा वापर केला जात असून अशा प्रकारच्या नोटीसा दिल्या जात आहेत. त्यांच्यासोबत जी लोकं जात आहेत, ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही आहे. ज्यांच्याकडे काही नाही ते लढाई लढत आहेत. त्यामुळे सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात येत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

किशोरी पेडणेकरांना ईडीची नोटीस

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून हे समन्स बजावण्यात आले आहे. पेडणेकर यांना ईडीने गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे आता किशोरी पेडणेकर या चौकशीला हजर राहतात का ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

रोहित पवारांना ईडीची नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आहे. बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणात ईडीकडून हे समन्स बजावण्यात आले आहेत. रोहित पवारांना बुधवारी (ता.24जानेवारी) ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ईडीने रोहित पवारांना नोटीस पाठवत चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितल्यानंतर आता रोहित पवार चौकशीसाठी हजर राहतात का ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

(Edited by : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT