Mumbai News : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची गेल्या तीन तासांपासून अधिक काळ सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशी सुरू आहे. कोरोना काळातील रुग्णांच्या बॉडी बॅग कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने पेडणेकर यांना समन्स बजावले होते. दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर पेडणेकर ह्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेल्या आहेत. (Kishori Pednekar has been interrogated by ED for the past three hours)
शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मागील महिन्यांत ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. त्यात त्यांना २३ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यानुसार त्या आज ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. ईडीच्या कार्यालयात जाऊन आता त्यांना तीन तासांपासून अधिकचा वेळ उलटून गेला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, किशोरी पेडणेकर यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करणारे माजी खासदार किरीट सोमय्या हेही ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांनी काल नागपाडा येथे ऑक्सिजन प्लाँट गैरव्यहारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्या तपास हे मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हा शाखेकडून केला जात आहे. मात्र, या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचा आरोप करणारे सोमय्या हे आज ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
मुंबई महापालिकेने कोरोना काळात महापालिका रुग्णालयांसाठी १८०० रुपयांची एक बाडी बॅग ही ६८०० रुपयांना विकत घेतल्याचा आरोप आहे. त्या वेळी महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर यांच्या सूचनेनुसार ही खरेदी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या प्रकरणी ईडीने पेडणेकर यांना यापूर्वीही समन्स बजावले होते. त्यावेळी पेडणेकर ह्या ईडीच्या चौकशीला सामोरे गेल्या नव्हत्या.
कागदपत्रे गोळा करण्यासाठी त्यांनी ईडीकडे चार आठवड्यांची मुदत मागितली होती. त्यानंतर ईडीने त्यांना २३ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहावे; म्हणून समन्स जारी केले होते. त्यानुसार किशोरी पेडणेकर चौकशीसाठी आज ईडीसमोर हजर झाल्या आहेत.
या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्यानंतर पेडणेकर या ४ सप्टेंबर रोजी न्यायालयात गेल्या होत्या. न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. पण, मुंबई पोलिसांच्या चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. चौकशीला पेडणेकर हजरही झाल्या होत्या. मात्र, ईडीने त्यांना पुन्हा समन्स पाठविले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.