Kolhapur Politics: राजकीय प्रतिस्पर्धी मुश्रीफ अन् घाटगेंकडून एकाच मंदिरात 22 जानेवारीला सोहळा

Hasan Mushrif vs Samarjeetsinh Ghatge: कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे राम मंदिर राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे.
Hasan Mushrif and Samarjeetsinh Ghatge:
Hasan Mushrif and Samarjeetsinh Ghatge: Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: 22 जानेवारीला आयोजित प्रभू श्री राम मंदिरात मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. देशातील गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत अनेक राम भक्त तल्लीन झालेत. देशासाठी हा आनंदाचा क्षण आहे. गल्लोगल्ली अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे राम मंदिर राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी 22 जानेवारीला लोक सोहळा आयोजित केला आहे. वास्तविक पाहता पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे हे आगामी विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी मानले जातात. अशातच दोघांकडून एकाच मंदिरात हा सोहळा संपन्न होणार आहे. समरजितसिंह घाटगे यांचे वडील राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून प्रभू श्रीरामाचे मंदिर साधारणपणे 15 वर्षांपूर्वी करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hasan Mushrif and Samarjeetsinh Ghatge:
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत शिवेंद्रराजेंनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा...

पालकमंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांनी दोघांनी 21 व 22 रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या सोहळ्याबाबतीत प्रभू श्रीरामाचे चित्र असलेल्या कापडी प्रसाद, पिशव्यांचे वाटप केले. या कार्यक्रमाबाबत बोलताना मुश्रीफ यांनी देशातील सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे चांगली करण्याचा प्रयत्न केंद्र शासन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे.

कागल येथील श्रीराम मंदिर बांधण्यामध्ये माझे मोठे योगदान आहे. त्यात माझा सिंहाचा वाटा आहे. 22 जानेवारीला देशातील 140 कोटी जनता हा सोहळा साजरा करणार आहे. याच दिवशी कागलमध्ये गैबी चौकात भव्यदिव्य कार्यक्रम घेणार आहोत. टाळ मृदंगाच्या गजरात व भव्य आतिषबाजीने हा सोहळा साजरा करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

दरम्यान, घाटगे यांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने कागलच्या राममंदिरातील कार्यक्रमाबाबत केंद्रीय मंत्र्यासह उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांना देखील आवाहन करण्यास विनंती केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे व्हिडिओ प्रसारित केले आहेत. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कागलमधील राम मंदिरातील आयोजित सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मंत्र्यांना केले आहे. मात्र याची चर्चा जिल्ह्यात जोरदार सुरु आहे.

(Edited by : Ganesh Thombare)

Hasan Mushrif and Samarjeetsinh Ghatge:
Nashik : 'बॉस'च्या 'बर्थ डे'ला कार्यालयातच 'ग्रॅण्ड सेलिब्रेशन'; आता 42 कर्मचाऱ्यांवर आली पश्चात्तापाची वेळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com