Mumbai, 21 August : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने ‘बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ची निवडणूक संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरली होती. मात्र, मुंबई महापालिकेची लिट्मस टेस्ट म्हणून पाहिले गेलेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे भाजप-शिवसेनेकडून ठाकरे बंधंच्या एकत्र येण्याची खिल्ली उडवली होती. बेस्टमधील पराभवावर युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रथमच भाष्य केले आहे. तसेच, भाजपला इशारा देताना ‘तेव्हा दोन बंधूंच्या एकत्र येण्याची ताकद तुम्हाला दिसेल’, असा सूचक इशारा दिला आहे.
बेस्ट (BEST) कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे युतीला पराभवाचा धक्का बसला. शिवसेनेची तब्बल नऊ वर्षांची सत्ता खालसा झाली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. विशेषतः ती मुंबईत होती, त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या ताकदीबाबत अंदाज वर्तविण्यात येत होते. मात्र, ठाकरेंना पराभवाचे तोंड पाहावे लागले.
शिवसेना-मनसे युतीला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. मात्र, शशांक राव यांच्या पॅनेलने सर्वाधिक 14 जागा मिळविल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रसाद लाड आणि महायुती समर्थक सहकार समृद्धी पॅनेलला सात जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येऊ पाहत असलेल्या ठाकरे बंधूंसाठी (Thackeray Brother) मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीतील पराभवावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रथमच भाष्य केले आहे. बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक हा ट्रायल बॉल होता. तो तसाच खेळण्यात आला. नियोजन पुढे-मागे झाले असेल. त्या ठिकाणी अंतर्गत काही फेरबदल होतील, ते पुढे होतीलच.
बेस्ट पतपेढीची निवडणूक ही एका युनियनपुरती होती. जो जनतेचा, महाराष्ट्राचा आणि मुंबईचा कल आहे, तो आपल्याला लवकरच दिसेल. दोन पक्ष, दोन भाऊ एकत्र येण्याच्या ताकदीचा धसका ज्यांनी घ्यायचा आहे, तो त्यांनी घेतला आहे. पण बेस्टची निवडणूक हा ट्रायल बॉल होता, जेव्हा खरी ओव्हर सुरू होईल, तेव्हा ती ताकद तुम्ही बघाल, असे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.