Aaditya Thackeray  Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार, 'त्या' पुलाचे उद्घाटन भोवणार; गुन्हा दाखल होण्याची शक्यता

BMC News : मुंबई महापालिका प्रशासनाची तक्रार काय ?

Deepak Kulkarni

Mumbai News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येलाच शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने आले होते.एकीकडे दोन्ही गटातला वाद शिगेला पोहचला असतानाच दुसरीकडे माजी मंत्री आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी परेल येथील उड्डाणपुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन केले. पण आता हेच उड्डाणपूल उद्घाटन आदित्य ठाकरेंना भोवणार असल्याची चिन्हे आहेत.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी रात्री परेल येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली होती. पण डिलाई रोड ब्रिजच्या लेनच्या उद्घाटन प्रकरणी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एन एम जोशी पोलीस स्टेशन येथे मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाकडून पूल उद्घाटन केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार आदित्य ठाकरे यांच्यासह पदाधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.(Shivsena Political News)

BMC प्रशासनाची तक्रार का?

मुंबई महापालिका(BMC) प्रशासनाकडून उद्घाटन केल्या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. महापालिका अधिकारी यांनीआदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीररित्या आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवला आहे.

मुंबई महापालिकेने साधारणपणे सात दिवसानंतर या ब्रिजचं काम पूर्ण करून लेन सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र, ठाकरे गटाने अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचं महापालिका प्रशासनाचे म्हणणं असल्याची माहिती समोर येत आहे.

आदित्य ठाकरेंचा आरोप काय...?

माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, आधी पुलाचे काम रखडवले होते.आमच्या मागणीनंतर काम पूर्ण झाले. यास आता अनेक दिवस झाले आहेत. आता कुणासाठी या पुलाचे उद्घाटन थांबवले आहे. पालकमंत्र्यांना वेळ नाही म्हणून लोकांची कोंडी करणार का? त्यामुळे लोकांसाठी उद्घाटन केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT