Gunratna Sadavarte  Sarkarnama
मुंबई

ST Bank Election: एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत अ‍ॅड.गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलचा मोठा विजय

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत आपला पॅनल उभा केला होता. या निवडणुकीत अ‍ॅड. सदावर्ते यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला आहे. 19 संचालकांच्या जागांपैकी 19 जागांवर अ‍ॅड.सदावर्ते यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे.

स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीच्या निकालात अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने मोठी बाजी मारत यश मिळवलं. या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे.

या बँकेची निवडणूक 23 जूनला राज्यभरातील 281 मतदान केंद्रावर पार पडली. रविवारी (ता.२५) या निवडणुकीची कॉटन एक्सचेंज बिल्डिंग, कॉटन ग्रीन येथे मतमोजणी झाली. त्यानंतर आज निकाल समोर आला आहे.

या बँकेच्या निवडणुकीत ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने सुरवातीपासूनच आघाडी घेतलेली होती. ती आघाडी शेवटपर्यंत कायम राहीली. त्यामुळे दुसऱ्या पॅनलला मोठा धक्का बसला.

या बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते यांचा एसटी कष्टकरी जनसंघ पॅनल, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा पॅनल आणि सेवा शक्ती संघर्ष पॅनलमध्ये जोरदार लढत झाली.मात्र, अखेर 19 पैकी 19 जागांवर अ‍ॅड.सदावर्ते यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT