Shivsena Shakha Demolition : शिवसेनेची 44 वर्षे जुनी शाखा पाडणाऱ्या अधिकाऱ्याला परबांकडून धमकी ; म्हणाले..

Anil Parab : त्या अधिकाऱ्याची कॉलर धरून त्याला उद्यापासून फिरवतो.
 Anil Parab
Anil Parab Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'च्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेवर मुंबई महापालिकेने (BMC) बुलडोजर नुकताच फिरवला आहे.

चाळीस वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या शिवसेना शाखेचे कार्यालय जमीनदोस्त झाल्यानं ठाकरे गट संतप्त झाला आहे. वांद्रेतील शिवसेनेच्या ४४ वर्षे जुन्या शाखेवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यालाच सोमवारी (ता. २६) ठाकरे गटाचे नेते, माजी परिवहनमंत्री अनिल परब यांनी सज्जड दम भरला.

अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली आज ठाकरे गटातर्फे मुंबई महापालिकेच्या एच पूर्व वॉर्डावर अनधिकृत बांधकाम, कचरा, नालेसफाई तसेच पाण्याच्या समस्यांबाबत मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना परबांनी शिवसेनेच्या शाखेवरील कारवाईवरुन पालिका अधिकाऱ्यांना दम दिला.

 Anil Parab
Sharad Pawar on Eknath Shinde : "कुठं गटार तुंबलं.." शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोमणा

"शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, महाजारांची मूर्ती आत असताना शिवसेनाची शाखा तोडली जाते. शिंदे सरकारमध्ये हिंमत असेल तर संबंधित पालिका अधिकाऱ्यावर कारवाई करावी. एवढे दिवस त्यांना अनधिकृत बांधकाम दिसले नाही. कारवाई न झाल्यास त्या अधिकाऱ्याची कॉलर धरून त्याला उद्यापासून फिरवतो. कुठ-कुठ अनधिकृत बांधकाम आहे, हे त्या अधिकाऱ्याला दाखवतो. अधिकाऱ्याने ते अनधिकृत बांधकामही तोडावे. अन्यथा आम्ही तुम्हाला तोडू," असे अनिल परब म्हणाले.

"सरकारला एवढी मस्ती कशाची आली आहे? बाळासाहेबांचे फोटो, शिवरायांची मूर्ती तोडली जात आहे. हे आपण आता सहन करू शकत नाही. आम्ही 15-20 दिवस वाट बघू. नंतर त्यांना कसे सरळ करायचे ते बघू. बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन सरकार स्थापन झाले आहे. संबंधित पालिका अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यास सरकारने बाळासाहेबांचे नाव घेणे बंद करावे," अशा शब्दात अनिल परबांनी शिंदे गटाला ठणकावले.

 Anil Parab
Ram Shinde News : बारामतीकरांना कुणाची भाषा समजली ? सीतारामन की सिद्धरामय्या यांची ; राम शिंदेंचा खोचक सवाल

"आमचे बापजादे काही आमदार, खासदार नव्हते. बाळासाहेबांनी आम्हाला बनवले आहे. आम्ही त्यांचा अपमान सहन करू शकत नाही. त्यामुळे हा इशारा मोर्चा आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर मोर्चा काढणार," असे परब म्हणाले.

मुंबईतील वांद्रे (Bandra ) परिसरात असलेली ही शाखा अनिधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे. या शाखेत ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरचे कार्यालय होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना ही शाखा स्थापन केली होती.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com